पुणे : पुण्याचे दिनानाथ मंगेशकर रुग्णालय डिपॉझिटच्या १० लाख रुपयांसाठी अडून बसले. तनिषा भिसे या महिलेवर त्यांनी आवश्यक ते उपचार केले नाही. रक्तस्राव वाढला, तनिषा भिसे यांची तब्येत खालावली. नंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. यामुळे सूर्या रुग्णालयाने उपचार केले तरी तनिषा यांना वाचवणे त्यांना शक्य झाले नाही. या प्रकरणात मंगेशकर रुग्णालय पैशांसाठी अडल्यामुळेच गरोदर असलेल्या तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला; असा अहवाल आहे. तनिषा भिसेंचा मृत्यू हा माता मृत्यू आहे. या प्रकरणात माता मृत्यू अन्वेषण समिती सखोल चौकशी करेल आणि दोषींवर कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई होईल; अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली.
पुण्यात राहणाऱ्या तनिषा भिसे या गरोदर महिलेची वैद्यकीय फाईल दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात होती. मंगेशकर रुग्णालयात प्रॅक्टिस करणारे डॉक्टर घैसास तनिषा भिसेंवर उपचार करत होते. डॉक्टरांनीच तनिषा यांना प्रसूतीसाठी २ एप्रिल ही तारीख दिली होती. पण २८ मार्च रोजी रक्तस्राव सुरू झाल्यामुळे तनिषा भिसे यांना घरच्यांनी तातडीने मंगेशकर रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी प्रसूतीसाठी शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले. प्रसूतीसाठी सिझेरियन करण्याआधी रुग्णालयाने १० लाख डिपॉझिट मागितले. भिसे कुटुंबाने तीन लाख रुपये लगेच जमा करण्याची तयारी दाखवली. उर्वरित रकमेची व्यवस्था पुढील तीन ते चार तासांत करतो नाहीतर दुसऱ्या दिवसापर्यंत नक्की करतो अशी ग्वाही भिसे कुटुंबाने दिली. पण रुग्णालय पैशांसाठी अडून बसले. अखेर नातलगांनी तनिषा भिसे यांना सूर्या रुग्णालयात नेले. तिथे रुग्णालयाने उपचार सुरू केले पण अती रक्तस्राव झाल्यामुळे तनिषा यांचा मृत्यू झाला. प्रसूती झाली पण मातेला वाचवणे सूर्या रुग्णालयाला शक्य झाले नाही.
मंगेशकर रुग्णालयाने पैशांना प्राधान्य दिले यामुळेच गरोदर महिलेने जीव गमावला. आता माता मृत्यू अन्वेषण समिती सखोल चौकशी करेल आणि दोषींवर कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई होईल; अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली.
आतापर्यंत ३३ हजार ५२७ महिलांनी घेतला या सुविधेचा लाभ प्रसूतीपूर्व काळजी आणि नियमित अंतराने समुपदेशन…
आहारातील मिठाचे प्रमाण नियंत्रित राखण्यासाठी महापालिकेकडून पुढाकार मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांच्या आहारामध्ये प्रतिदिन वापरल्या…
अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफविरोधात आज अमेरिकेत हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर निसर्गवेद’ जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला या सजीव सृष्टीचे गणित समजणार…
सेवाव्रती : शिबानी जोशी आपण गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून मेक इन इंडिया, स्किलिंग इंडिया, स्टार्टअप इंडिया…
मुंबई: वानखेडेच्या मैदानावर आज मुंबई आणि आरसीबी यांच्यात चांगलाच रंगतदार सामना झाला. मुंबईच्या शेवटच्या बॉलपर्यंत…