नवी दिल्ली : सीएनजी गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. जून २०२४ नंतर पहिल्यांदाच सीएनजीच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड कंपनीने आपल्या सीएनजी गॅसचे दर वाढवले आहेत. त्यानुसार हे नवे दर आजपासून लागू होणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर पुन्हा एकदा भार पडणार असल्याचं चित्र दिसून येत आहे.
इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड म्हणजेच आयजीएलने सीएनजीची किंमत एक रुपयांवरून तीन रुपये केली आहे. दिल्लीत सीएनजीच्या किमतीत १ रुपयांची वाढ झाली आहे, तर इतर ठिकाणी ३ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आयजीएल दिल्लीमध्ये सुमारे ७० टक्के गॅस विकते, तर उर्वरित ३० टक्के गॅस इतर कंपन्यांचा आहे.सीएनजीच्या किमतीत झालेल्या या वाढीनंतर आता दिल्लीत सीएनजीची किंमत ७६.०९ रुपये झाली आहे आणि नोएडा-गाझियाबादमध्ये सीएनजी ८४.७० रुपये प्रति किलो झाली आहे.
ST Bus : एसटीच्या ५० कालबाह्य बसेस भंगारात; परिवहन महामंडळाचा निर्णय
मुंबईत आज सीएनजी ७७ रुपये प्रति किलोवर विकले जात आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये, आयजीएलने दिल्लीत सीएनजीच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला होता. ब्रोकरेज फर्म जेफरीजने फेब्रुवारीमध्ये आयजीएलवरील त्यांच्या नोटमध्ये म्हटले होते की, सध्याची नफा कायम ठेवण्यासाठी २ रुपयांची किंमत वाढ पुरेशी असेल. भारतात सीएनजीवर चालणाऱ्या अनेक गाड्या आहेत. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सीएनजी कार खरेदीत वाढ झाली आहे. मात्र, आता सीएनजीच्या किंमतीतही वाढ झाल्याने वाहनधारकांना चांगलाच फटका बसणार आहे.