मुंबई: आयपीएल २०२५मध्ये शनिवारी झालेल्या डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सला २५ धावांनी हरवले. या सामन्याचा हिरो ठरला केएल राहुल त्याने ५१ बॉलमध्ये ७७ धावांची खेळी केली. दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सला ५० धावांनी हरवले. यात जोफ्रा आर्चरने ३ विकेट घेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळवला. या दोन्ही सामन्यात यजमान संघाचा पराभव झाला. यासोबतच दिल्ली कॅपिटल्सचा संघ पॉईंट्सटेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे.
चेपॉकमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने १८३ धावा केल्या होत्या. केएल राुलने संघासाठी सर्वाधिक ७१ धावांची खेळी केली. आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सने ७४ धावांत ५ विकेट गमावले होते. धोनी जेव्हा क्रीझवर आला तेव्हा सीएसकेला ५६ बॉलमध्ये ११० धावा हव्या होत्या. एमएस धोनीने ३० धावा केल्या मात्र यासाठी २६ बॉल वापरले. सीएसके आपल्या आव्हानापासून २५ धावा मागे राहिली.
दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना २०५ धावा केल्या. यशस्वी जायसवालने ६७ आणि रियान परागने नाबाद ४३ धावा केल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्सने आपले २ विकेट पहिल्याच षटकांत गमावले होते. नेहल वढेराने सर्वाधिक ६२ धावा केल्या मात्र पंजाबच्या विजयासाठी या पुऱ्या पडल्या नाहीत. पंजाबला १५५ धावाच करता आल्या.
दिल्ली कॅपिटल्स विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांनी तीन सामने जिंकले असून त्यांचे ६ गु आहेत. तर पंजाब किंग्सचा संघ पहिल्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानावर घसरला आहे. राजस्थानने पंजाबविरुद्धचा सामना जिंकल्याने त्यांनी मोठी झेप घेतली आहे. राजस्थान ९व्या स्थानावरून ७व्या स्थानावर आला आहे. त्यांचा ४ सामन्यांतील दुसरा विजय आहे. तर चेन्नई सुपर किंग्स८व्या स्थानावरून ९व्या स्थानावर आले आहेत. सगळ्यात खालच्या स्थानावर सनरायजर्स हैदराबाद आहे त्यांनी ४ पैकी एकच सामना जिंकला आहे. मुंबई इंडियन्सचा संघ ८व्या स्थानावर आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…