चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील (Chandrapur News) पर्यटकांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी (Tadoba Safari) थेट सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. याकरिता शहरातून क्रुझर जिप्सीच्या (Cruiser Gypsy) सेवेला सुरूवात होत आहे. वनमंत्र्यांनी या सेवेला हिरवा झेंडा दाखवला आहे. महिनाभरात सेवा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी, वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या विषयाच्या अनुषंगाने बैठक घेतली आहे. वन मंत्री गणेश नाईक यांची भेट घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी ही मागणी केली होती. गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
ताडोबा हे देशभरात व्याघ्र प्रकल्पासाठी (Tadoba-Andhari Tiger Reserve) प्रसिद्ध आहे. येथे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. चंद्रपूर शहरातून ताडोबाला जाण्यासाठी थेट सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांना आणि स्थानिकांची गैरसोय होत होती. त्यामुळे चंद्रपूर शहरातून ताडोबात क्रुझर सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आमदार जोरगेवार यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सादर केला होता. या मागणीला राज्याचे वनमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या सेवेला हिरवा झेंडा दाखवला आहे.
या बैठकीत क्रुझरच्या मार्गाची वेळापत्रक, तिकीट दर, बुकिंग व्यवस्था आणि इतर तांत्रिक बाबींवर चर्चा झाली. तसेच संजय सब्बनवार यांनी तयार केलेली गोंडकालीन किल्ल्याची लघुप्रतिकृती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ठेवली जाणार आहे.
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…