Tuesday, May 13, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

MHADAची भन्नाट ऑफर! केवळ १ रुपयात डॉक्टरांचा सल्ला, १० मध्ये तपासण्या

MHADAची भन्नाट ऑफर! केवळ १ रुपयात डॉक्टरांचा सल्ला, १० मध्ये तपासण्या

मुंबईत म्हाडाचा 'आपला दवाखाना' उपक्रम लवकरच सुरू


मुंबई : मुंबईतील सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा मिळावी यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) तर्फे ‘आपला दवाखाना’ ही योजना राबवण्यात येणार आहे. यामध्ये फक्त १ रुपयात वैद्यकीय सल्ला आणि १० रुपयामध्ये रक्त व डायबेटीससारख्या तपासण्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.


ही योजना राज्याचे गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात असून, मुंबईतील ३४ म्हाडा वसाहतींमध्ये हे आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.



कोणत्या भागांमध्ये होणार सुरूवात?


या दवाखान्यांचे जाळे कुलाबा, कफ परेड, चेंबूर, घाटकोपर, विक्रोळी, कांदिवली, सायन, अंधेरी, वांद्रे, जुहू, कुर्ला आणि बोरीवली अशा विविध MHADA वसाहतींमध्ये उभारले जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी ४०० चौरस फुटाचे स्वतंत्र केंद्र राहणार आहे.



कोण राबवणार उपक्रम?


ही योजना ‘वन रुपी क्लिनिक’ चालवणाऱ्या Magicdil Health for All संस्थेच्या सहकार्याने राबवली जाणार आहे. MHADA च्या वांद्रे येथील मुख्यालयात CEO संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत या भागीदारीचे औपचारिक करार झाले.



MHADA चे उद्दिष्ट काय?


MHADA च्या म्हणण्यानुसार, “या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून MHADA वसाहतींमधील हजारो रहिवाशांना आरोग्य सुविधा सहज व कमी किमतीत मिळतील. शिवाय, ही सुविधा सर्वसामान्य जनतेसाठीही खुली असेल.”


या उपक्रमामुळे शहरातील गरजू आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी स्वस्त व चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे, असे MHADA ने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment