जम्मू : भारत – पाकिस्तान सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या कारवाईत एक घुसखोर ठार झाला. ही घटना जम्मू सेक्टरमध्ये घडली.
जम्मू सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानमध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे लक्षात येताच सीमा सुरक्षा दल सावध झाले. जवान डोळ्यात तेल घालून घुसखोर सीमेवर लक्ष ठेवू लागले. पाकिस्तानमधून घुसखोरीचा प्रयत्न सुरू होताच सीमा सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. या कारवाईत एक घुसखोर ठार झाला. घुसखोराला आधी शरण येण्याचा इशारा देण्यात आला होता. पण या इशाऱ्याला न जुमानता घुसखोर पुढे येत असल्याचे बघून त्याच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. य गोळीबारात घुसखोर ठार झाला.
ताज्या घुसखोरीच्या प्रयत्नाची माहिती देत भारताच्या सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानी रेंजर्सच्या अधिकाऱ्यासमोर निषेध नोंदवला आहे. पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न झाला तर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. घुसखोराची ओळख पटविण्याची तसेच घुसखोरीचा प्रयत्न करण्यामागचे कारण जाणून घेण्याची कारवाई सीमा सुरक्षा दलाने सुरू केली आहे.
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…