अवकाळीचा शेतक-यांना मोठा फटका; आंबा, द्राक्ष, डाळींब, कांदा, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

नाशिक : जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal rains) सटाणा, कळवण, दिंडोरी, नाशिक या चार तालुक्यांना चांगलेच झोडपले. अवकाळीमुळे कांदा, द्राक्षे, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात १२९७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून यात ११७५ हेक्टर क्षेत्रावरील कांदा पिकाचा समावेश आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या १९९० आहे.


हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांनी कांदा काढणीस लगबगीने सुरूवात केली होती. मात्र, काढून ठेवलेला कांदा शेतातच झाकून ठेवल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच काढणी योग्य कांद्याचे देखील नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान सटाणा तालुक्यात झाले असून तालुक्यात ११०० क्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले. ५० हेक्टरवरील भाजीपाला, १५ हेक्टरवरील डाळिंब अशा एकूण ११५५ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. या पावसामध्ये पीका नुसार कांदा - ११७५, द्राक्ष -१९.८० भाजीपाला - ६०.६०, गहू - १०, टोमॅटो १०, डाळींब -१९.६०, इतर २, हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे.



तालुक्यातील औंदाणे, कौतिकपाडे, बिजोठे, आखतवाडे, निताणे, पारनेर, जायखेडा, नांदीन, दरेगाव, तांदूळवाडी, मोसम आरम परिसरात गारांचा पाऊस झाल्याने तालुक्यातील १७०० शेतकऱ्यांना याचा फटका बसला. दिंडोरी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. पावसाचा कांदा, द्राक्षे, गहू, हरभरा आदी पिकांना फटका बसला प्राथमिक अहवालानुसार ८ हेक्टरवरील कांदा, ५.८० हेक्टरवरील द्राक्षे अशा एकूण १५ हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. कळवण तालुक्यात ५५ हेक्टरवरील कांदा, १० हेक्टरवरील भाजीपाला व १० हेक्टर क्षेत्रावरील टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे.



बार्शीत अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका


सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी, मळेगाव, हिंगणी, बोरगाव, झाडी, उपळे, महागाव, पिंपळगाव, जामगाव, कापशी परिसरात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. जवळपास अर्धा तास कोसळलेल्या या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कांदा पिकांसह ज्वारी, गहू, हरभरा, आंबा, द्राक्ष या पिकांना मोठा फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंता वाढली आहे.


दोन दिवसांपासून या भागात ढगाळ वातावरण होते. दिवसभर उन्हाची तीव्रता जाणवत असतानाही सायंकाळी अचानक वातावरण बदलले आणि जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काढणीला आलेली पिके मोठ्या प्रमाणावर भिजली. कांदा, ज्वारी, गहू आणि हरभऱ्याच्या पिकांवरही या पावसाचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. आंबा, द्राक्ष बागायतदारांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.

Comments
Add Comment

Amit Satam : 'जेन-झी' आणि 'जेन-नेक्स्ट' काँग्रेसला कधीही स्वीकारणार नाही!

- अमित साटम; देशविरोधी शक्तींकडून पैसे घेऊन अराजकता पसरवण्याचा विरोधकांचा डाव मुंबई : देशातील तरुण वर्ग अर्थात

Prithviraj Chavan : २०१४ मध्येच होता महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव

- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा; उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाची होती योजना मुंबई :

Hinjewadi Metro : पुणेकरांसाठी मोठी बातमी! माण-बालेवाडी मेट्रोला सुरक्षा मंजुरी; उद्घाटनाअभावी सेवा रखडली

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील (Pune) प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हिंजवडी आयटी पार्कला जोडणाऱ्या

Gold Silver Rate Today : बाईई...सोन्या-चांदीचा भडका! २४ तासांत दर उच्चांकी पातळीवर; पाहा आजचे ताजे भाव!

जळगाव : जळगावच्या (Jalgoan) स्थानिक सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी दरवाढ नोंदवली गेली. गेल्या २४ तासांत

Pune News : पुणे रेल्वे यार्डात 9 तासांचा मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

पुणे : पुणे रेल्वे विभागाकडून पुणे यार्डातील ट्रॅक आणि सिग्नल यंत्रणेच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात आले

Beed News : पुण्यात खळबळ! बीडचा नामांकित राष्ट्रीय खो-खो खेळाडूची आत्महत्या; POCSO गुन्ह्यानंतर होता फरार

बीड : बीडचा राष्ट्रीय स्तरावरील खो-खो खेळाडू तुकाराम करांडे याने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची