बीएसएनएलने जोडले ५५ लाखांहून अधिक नवे ग्राहक

  84

ज्योतिरादित्य शिंदे यांची राज्यसभेत माहिती


नवी दिल्ली : भारत दूरसंचार निगम लिमीटेडने (बीएसएनएल) गेल्या ७ महिन्यात ५५ लाखांहून अधिक नवीन ग्राहक सामील झाले आहेत, ज्यामुळे कंपनीच्या एकूण ग्राहकांची संख्या ९.१ कोटी झाली आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.

यासंदर्भात शिंदे यांनी सांगितले की, जून २०२४ ते या वर्षी फेब्रुवारीपर्यंत बीएसएनएल ग्राहकांची संख्या ८.५५ कोटींवरून ९.१ कोटी झाली आहे. बीएसएनएल तब्बल १८ वर्षांनंतर ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत नफ्यात आली आहे. देशभरातील ज्या गावांमध्ये मोबाईल सेवा पोहोचलेल्या नाहीत, तिथे ४-जी मोबाईल सेवा पुरवण्यासाठी बीएसएनएल एका महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करत आहे. या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्याची एकूण किंमत २६,३१६ कोटी रुपये आहे. यामध्ये विद्यमान २-डी बीटीएसला ४-जी मध्ये अपग्रेड करणे देखील समाविष्ट आहे. याशिवाय, बीएसएनएल एलडब्ल्यूई फेज-1 योजनेअंतर्गत स्थापित केलेल्या २३४३ विद्यमान २जी बीटीएसचे २जी ते ४जी पर्यंत अपग्रेडेशन देखील करत आहे, ज्याची अंदाजे किंमत १८८४.५९ कोटी रुपये असल्याचे शिंदे म्हणाले.

भारत 4-जी नेटवर्क उपकरणे तयार करणारा जगातील पाचवा देश बनला आहे. देशात एक लाख 4-जी टॉवर बसवण्याचे लक्ष्य साध्य केल्यानंतर बीएसएनएल ५-जीची अंमलबजावणी सुरू करेल. सुमारे ७३. ३२६ 4-जी टॉवर बसवण्यात आले आहेत, जे एकूण कामाच्या सुमारे ७३ टक्के आहे. उर्वरित कामही लवकरच पूर्ण केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

भारतात 5-जी ची अंमलबजावणी जगात सर्वात जलद झाली आहे आणि गेल्या एका वर्षात ९९ टक्के जिल्हे आणि ८२ टक्के लोकसंख्या या योजनेत समाविष्ट झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Amit Shah: अमित शहांनी लालकृष्ण अडवाणींचा विक्रम मोडला! भूषविले सर्वाधिक काळ गृहमंत्रीपद

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावे एक विक्रम प्रस्थापित झाला आहे. सर्वाधिक काळ देशाचे

DRDO गेस्ट हाऊसच्या मॅनेजरला हेरगिरी प्रकरणात अटक

नवी दिल्ली: ज्योती मल्होत्रानंतर भारतातील गुप्तचर यंत्रणानी आणखी एका हेराला अटक केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर

Uttarkashi Cloud burst: उत्तरकाशीच्या धारलीमध्ये ढगफुटी, डोंगरावरून वाहत आले हजारो टन पाणी, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्यात गाडले, पहा VIDEO

उत्तरकाशी: उत्तरकाशीमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे सर्वत्र हाहाकार पसरला आहे. येथील धारली गावात आलेल्या

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

नवी दिल्ली: जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात

PM Modi : एनडीएच्या बैठकीत मोदींचा सत्कार; 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'महादेव'च्या यशावर अभिनंदनाचा वर्षाव! पाहा VIDEO

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्ली येथे झालेल्या एनडीए संसदीय

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे