मुंबई : भारतात सध्या IPL २०२५ स्पर्धांचा हंगाम सुरू आहे. स्पर्धेचा नवीन हंगाम सुरू होऊन आठवड्याहून जास्त कालावधी झाला आहे. रोज रोमांचक सामने खेळले जात आहेत. याचदरम्यान, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकरने एक क्रिकेट संघ खरेदी केला आहे. सारा तेंडुलकरने ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग (GEPL) मध्ये मुंबई फ्रँचायझी खरेदी केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिजिटल मनोरंजन आणि तंत्रज्ञानातील जागतिक आघाडीची कंपनी जेटसिंथेसिसने घोषणा केली आहे की, सारा तेंडुलकरने ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग (GEPL) मध्ये मुंबई फ्रँचायझी खरेदी केली आहे. या लीगचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार आहे.जेटसिंथेसिसचे सीईओ राजन नवानी म्हणाले की, मुंबई संघाची फ्रँचायझी मालक म्हणून सारा तेंडुलकरचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. साराला खेळ आणि ई-स्पोर्ट्समध्ये खूप रस आहे. तिची प्रचंड लोकप्रियता आमच्या मोहिमेत आम्हालाही फायदा होईल.
आपला आनंद व्यक्त करताना सारा तेंडुलकर म्हणाली की, क्रिकेट हा आमच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ई-स्पोर्ट्समध्ये क्रिकेटचा आनंद घेणे रोमांचक असेल. GEPL मध्ये मुंबई फ्रँचायझीची मालकी मिळवणे हे माझ्यासाठी एक स्वप्न पूर्ण झाले आहे. खेळावरील माझे प्रेम आणि शहराबद्दलची आवड यां दोन्हीचा यात समावेश आहे. मी आमच्या संघासह एक दमदार ई-स्पोर्ट्स फ्रँचायझी तयार करण्यास उत्सुक आहे.
GEPL ही स्पर्धा ‘रिअल क्रिकेट’ या तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या गेमवर खेळली जाते. आतापर्यंत ३० कोटींहून अधिक लोकांनी ते डाउनलोड केले आहे. पहिल्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच या लीगची तरुणांच्यात प्रचंड क्रेझ आहे. रिपोर्ट्सनुसार, GEPL चा मल्टीप्लॅटफॉर्म रिच ७० मिलियनहून अधिक आहे आणि JioCinemas आणि Sports१८ वर २.४ दशलक्षाहून अधिक मिनिटे स्ट्रीम केली गेली आहेत, ज्यामुळे GEPL ने क्रिकेट ई-स्पोर्ट्समध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…
नवी दिल्ली : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने देश हादरून गेला असतानाच, केंद्र सरकारने…