Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Mumbai-Goa highway : आमदार निलेश राणेंनी घेतला मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा

Mumbai-Goa highway : आमदार निलेश राणेंनी घेतला मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा

मुंबई : मुंबई -गोवा महामार्गाच्या(Mumbai-Goa highway) कामाला गती द्या तसेच काम लवकर पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी अधिकान्यांना दिल्या आहेत. आमदार राणे चिपळूण दौऱ्यावर असताना त्यांनी महामार्गाच्या कामाच्या आढावा घेतला.मुंबई – गोवा महार्मागाच्या(Mumbai-Goa highway) चौपदरीकरणाचे काम गेल्या १२ ते १५ वर्षांपासून रखडले आहे. केंद्र तसेच राज्य सरकारच्या वतीने महामार्गाबाबत वारंवार नव्या डेडलाईन दिल्या जात आहेत.

पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे महामार्गाची रखडलेली काम लवकरात लवकर पूर्ण करावीत अशा सूचना आमदार निलेश राणे यांनी चिपळूण दौऱ्यावर असताना उपविभागीय अधिकान्यांना दिल्या. डिसेंबर २०२५ पूर्वी बहुतांश कामे पूर्ण होतील, असे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग उपविभाग चिपळूणचे अधिकारी नजीम मुल्ला आणि खुणेकर यांनी आमदार निलेश राणे यांच्या आढावा बैठकीत दिले आहे. यावेळी स्थानिक राजकीय नेते आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जानेवारी २०२६ पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होईल अशी ग्वाही दिली होती.

गोवा महामार्गाच्या(Mumbai-Goa highway) कामाला गती द्या तसेच काम लवकर पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी अधिकान्यांना दिल्या आहेत. आमदार राणे चिपळूण दौऱ्यावर असताना त्यांनी महामार्गाच्या कामाच्या आढावा घेतला.मुंबई – गोवा महार्मागाच्या(Mumbai-Goa highway) चौपदरीकरणाचे काम गेल्या १२ ते १५ वर्षांपासून रखडले आहे. केंद्र तसेच राज्य सरकारच्या वतीने महामार्गाबाबत वारंवार नव्या डेडलाईन दिल्या जात आहेत.

पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे महामार्गाची रखडलेली काम लवकरात लवकर पूर्ण करावीत अशा सूचना आमदार निलेश राणे यांनी चिपळूण दौऱ्यावर असताना उपविभागीय अधिकान्यांना दिल्या. डिसेंबर २०२५ पूर्वी बहुतांश कामे पूर्ण होतील, असे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग उपविभाग चिपळूणचे अधिकारी नजीम मुल्ला आणि खुणेकर यांनी आमदार निलेश राणे यांच्या आढावा बैठकीत दिले आहे. यावेळी स्थानिक राजकीय नेते आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जानेवारी २०२६ पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होईल अशी ग्वाही दिली होती.

Comments
Add Comment