Saturday, May 10, 2025

मनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Maharashtrachi Hasyajatra New Rap Song : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’कार्यक्रमाचं जबरदस्त महारॅप सॉंग प्रेक्षकांच्या भेटीला

Maharashtrachi Hasyajatra New Rap Song : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’कार्यक्रमाचं जबरदस्त महारॅप सॉंग प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राच्या हास्यजत्रेनं महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यांत अनेक नामवंत, दिग्गजही आहेत. महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या नव्या पर्वातून नवे विषय, नवनवीन प्रहसनं यांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहेच. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा - कॉमेडीची हॅटट्रीक' घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेच. नवं पर्व म्हटलं की काहीतरी नवनवीन गोष्टी आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहेत.


महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचं महारॅप सॉंग हे गुपित आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गायक (रॅपर) सुजय जाधव उर्फ सुजय जिब्रीश यांनी हे महारॅप सॉंग गायलं आहे. संगीत-दिग्दर्शक अनिरुद्ध निमकर यांनी हे महारॅप सॉंग संगीतबद्ध केलं आहे. 'चल तुला दाखवतो जत्रा' असे या महारॅप सॉंगचे शब्द आहेत. या महारॅप सॉंगमध्ये महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतले सगळे कलाकार असणार आहेत. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव महाराष्ट्राच्या हास्यजत्रेची वेळ आता खास रात्री ९ वाजता करण्यात आलेली आहे. जबरदस्त रॅप गाणं प्रदर्शित करत ‘सोनी मराठी वाहिनी नं आपल्या प्रेक्षकांना ही आनंदाची बातमी दिली आहे.



'आयुष्यात मॅटर आहेत सतरा,


काही टेन्शन नाही मित्रा,


सगळ्यावरची एकच मात्रा,


महाराष्ट्राची हास्यजत्रा…!'


अशा ओळी या रॅपच्या आहेत. हास्यजत्रेच्या नव्या रॅपसाँगमध्ये समीर चौघुले, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप, श्रमेश बेटकर, अरुण कदम, प्रभाकर मोरे, ओंकार राऊत, रसिका वेंगुर्लेकर, रोहित माने, श्याम राजपूत, प्रथमेश शिवलकर, दत्तू मोरे, ईशा डे, चेतना भट, वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर, निखिल बने हे कलाकार आहेत. याशिवाय निवेदिका प्राजक्ता माळी, परीक्षक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर हेही या रॅप साँगमध्येमध्ये सहभागी आहेत. हे गाणे पाहण्यासाठी सोनी मराठी पाहत राहा अथवा सोनी मराठी वाहिनीच्या युटयूब पेजवर पाहता येईल. लिंक -

अथवा सोशल मीडिया म्हेणजेच इंस्टाग्राम आणि फेसबुक वर पाहायला मिळेल. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' रात्री ९ वाजता आपल्या भेटीला येत आहे...

Comments
Add Comment