पोलिसाच्याच घरी झाली चोरी, २१ तोळे सोन्यासह रोकड चोरट्यांनी केली लंपास

सोलापूर : अज्ञात चोरट्याने पोलिसाचे घर फोडून २१ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम, पोलिस गणवेश असा ८ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज आणि शेजाऱ्याच्या घरातील ४० हजारांची रोकड असा एकूण नऊ लाखांचा ऐवज चोरून धूम ठोकली.

मळेगाव (ता. बार्शी) येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिस सेवेत असलेल्या संताजी अलाट यांच्या आई भागिरथी मधुकर अलाट यांनी पांगरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा नोंदला आहे.

फिर्याद दाखल होताच ताफ्यासह ठसे तज्ज्ञ, श्वानपथकास पाचारण केले होते. श्वान घरापासून पाचशे मीटर अंतरावर जाऊन घुटमळत राहिले. फिर्यादीत म्हटले आहे की, मळेगाव येथील घरी रात्रीच्या नऊ वाजता फिर्यादीसह सर्वजण जेवण आटोपून झोपले होते.
Comments
Add Comment

थेट शर्यतीत पळणाऱ्या बैलांवर भानामती! कोल्हापूरातील स्मशानात आढळून आला अंधश्रद्धेचा प्रकार

कोल्हापूर: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील

घरगुती ग्राहकांसाठी प्रीपेड मीटर नाही : मुख्यमंत्री

नागपूर : राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. मात्र, सामान्य

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारीला मुंबईत

नागपूर : नागपुरच्या गुलाबी थंडीत गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले. पुढील

मुंबईकरांना हक्काचं घर आणि विदर्भाला विकासाचं वैभव!

अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही "मुंबई फास्ट, महाराष्ट्र

मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे 'रेहमान डकैत' कोण..?

महानगरपालिका निवडणूक जिंकून महायुतीच ठरेल असली ' धुरंधर ' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती

Winter Session : पाच वर्षे एकही योजना बंद करणार नाही!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार मुंबई : “निवडणुका