Friday, May 9, 2025

महामुंबईमहाराष्ट्रमनोरंजनमल्टिप्लेक्सब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Fawad Khan : पाकिस्तानी अभिनेता फवाद खान पुन्हा हिंदी सिनेमात दिसणार, मनसेचा संताप

Fawad Khan : पाकिस्तानी अभिनेता फवाद खान पुन्हा हिंदी सिनेमात दिसणार, मनसेचा संताप
MNS leader Ameya Khopkar Angry Reaction On Fawad Khan Comeback : पाकिस्तानी अभिनेता फवाद खान नऊ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. तो अभिनेत्री वाणी कपूरसोबत 'अबीर गुलाल' या हिंदी चित्रपटात दिसणार आहे. 'अबीर गुलाल' हा चित्रपट म्हणजे रोमँटिक कॉमेडी ड्रामा आहे. या चित्रपटाचा टीझर मंगळवार १ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. हा टीझर येताच मनसेने संताप व्यक्त केला आहे.







मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पाकिस्तानी कलाकाराच्या बॉलिवूडमधील एन्ट्रीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर अशी पोस्ट केली आहे की, 'पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, हे इतक्या वेळा सांगूनही काही नासके आंबे उपटतातच. मग त्यांना कचऱ्यात टाकायचं काम मनसैनिकांनाच करावं लागणार आणि आम्ही ते करणार, करत राहणार… ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही. ज्यांना पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घ्यायचंय त्यांनी खुशाल घ्या, पण लक्षात ठेवा सामना आमच्याशी आहे.' खोपकर यांनी याआधीही पाकिस्तानी कलाकारांनी भारतात काम करण्याविरोधात आवाज उठवला आहे.



निर्मात्यांनी 'अबीर गुलाल' हा चित्रपट ९ मे रोजी प्रदर्शित करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर अमेय खोपकर यांनी पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, असे जाहीर करत मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा दिला आहे.





 










View this post on Instagram























 

A post shared by Vaani Kapoor (@vaanikapoor)






फवाद बॉलिवूडमध्ये शेवटचा 'कपूर अँड सन्स' या सिनेमात २०१६ मध्ये दिसला. यानंतर उरीमध्ये अतिरेकी हल्ला झाला आणि भारतात पाकिस्तानच्या कलाकारांवर बंदी घालण्यात आली. ऑक्टोबर २०२३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली. यानंतर 'अबीर गुलाल' या हिंदी चित्रपटाचे काम सुरू झाले. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने बॉलिवूडमध्ये 'खुबसूरत', 'ए दिल है मुश्कील' आणि 'कपूर अँड सन्स' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'जिंदगी गुलजार है' आणि 'हमसफर' या त्याच्या पाकिस्तानी ड्रामा सीरिजचे असंख्य चाहते आहेत.
Comments
Add Comment