Central Railway : मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांच्या सेवा कालावधीत वाढ!

मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन काही विशेष गाड्यांच्या सेवा कालावधीत वाढ केली आहे. दौंड - अजमेर - दौंड साप्ताहिक विशेष गाडी दौंड ते अजमेर विशेष, गाडी १० एप्रिलपासून २६ जूनपर्यंत धावेल. अजमेर ते दौंड विशेष ही २८ मार्चपर्यंत चालवण्यात येणार होती ती आता ११ एप्रिलपासून २७ जूनपर्यंत धावेल.



सोलापूर - अजमेर - सोलापूर साप्ताहिक विशेष गाडी २७ मार्चपर्यंत धावणार होती, ती आता १० एप्रिल ते २६ जूनपर्यंत धावणार आहे. अजमेर ते सोलापूर विशेष गाडी ६ मार्चपर्यंत धावणार होती, ती आता ९ एप्रिलपासून २५ जूनपर्यंत धावेल. साई नगर शिर्डी - बीकानेर - साई नगर साप्ताहिक शिर्डी विशेष गाडी १३ एप्रिलपासून २९ जूनपर्यंत धावेल. बीकानेर ते साई नगर शिर्डी विशेष, १२ एप्रिल ते ८ जूनपर्यंत धावेल. दादर - भुसावळ - दादर विशेष - गाडी आता ३० जूनपर्यंत धावेल. भुसावळ ते दादर विशेष,गाडी आता ४ एप्रिलपासून २७ जूनपर्यंत धावेल. दादर ते भुसावळ विशेष गाडी ४ मेपासून २७ जूनपर्यंत धावेल.


पुढील अनारक्षित विशेष रेल्वे सेवांचा विस्तार ३१ जुलैपर्यंत करण्यात आला आहे.




  • गाडी क्रमांक ०७३०१ बेळगावि ते मिरज

  • गाडी क्रमांक ०७३०२ मिरज ते बेळगावी

  • गाडी क्रमांक ०७३०३ बेळगावी ते मिरज

  • गाडी क्रमांक ०७३०४ मिरज ते बेळगावी


या गाड्यांच्या वेळेत, संरचनेत आणि थांब्यात कोणताही बदल होणार नाही.

Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून