Waqf Bill : भाजपाचे सर्व खासदार हजर व्हा, वक्फ विधेयकासाठी व्हिप जारी

Share

नवी दिल्ली : लोकसभेत वक्फ विधेयक बुधवार २ एप्रिल रोजी सादर होणार आहे. हे विधेयक चर्चेअंती विना अडथळा मंजूर व्हावे यासाठी सत्ताधारी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपाने लोकसभेतील पक्षाच्या सर्व सदस्यांना तीन ओळींचा व्हिप बजावला आहे. या व्हिपद्वारे भाजपाच्या लोकसभेतील सर्व खासदारांना बुधवार २ एप्रिल रोजी दिवसभर कामकाजासाठी हजर राहण्याचे तसेच मतदानावेळी पक्षाच्या अधिकृत भूमिकेचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याआधी संसदीय कामकाज आणि अल्पसंख्यांक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी ८ ऑगस्ट २०२४ रोजी वक्फ विधेयक लोकसभेत सादर केले होते. त्यावेळी विधेयक लोकसभेतून एकमताने संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय झाला होता. यानंतर जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीने केलेल्या शिफारशी आणि सूचनांच्याआधारे वक्फ विधेयकाचा सुधारित मसुदा लोकसभेत सादर होणार आहे.

भाजपाने व्हिप काढला आहे. रालोआतील इतर घटक पक्षांकडूनही व्हिप काढले जाण्याची शक्यता आहे. तेलगू देसम पक्षाने विधेयकाचे समर्थन करणार असल्याचे जाहीर केले आहे. लोकसभेत सध्या ५४२ खासदार आहेत. यात भाजपाचे २४० खासदार आहेत. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए अर्थात रालोआचे एकूण खासदार २९३ आहेत. विधेयक मंजूर करण्यासाठी २७२ जणांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. यामुळे लोकसभेत रालोआची बाजू भक्कम दिसत आहे. लोकसभेत काँग्रेसचे ९९ खासदार आहेत. इंडी आघाडीचे एकूण खासदार २३३ आहेत. या व्यतिरिक्त काही लहान पक्षांचे खासदार आणि निवडक अपक्ष खासदार आहेत. पण या मंडळींनी वक्फ विधेयकाला विरोध करणार की पाठिंबा देणार हे जाहीर केलेले नाही. ही आकडेवारी बघता लोकसभेत विरोधकांची बाजू कमकुवत आहे.

लोकसभेत मंजूर झाले तर वक्फ विधेयक लवकरच राज्यसभेत सादर केले जाण्याची शक्यता आहे. राज्यसभेत सध्या २३६ खासदार आहेत. यात भाजपाचे ९८ खासदार आहेत. भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए अर्थात रालोआचे एकूण खासदार ११५ आहेत. सहा नामनिर्देशित खासदार सरकारच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता गृहित धरली तर विधेयकाला १२१ जणांचा पाठिंबा मिळेल. विधेयक मंजूर करण्यासाठी ११९ जणांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. यामुळे राज्यसभेतही रालोआची बाजू विरोधकांच्या तुलनेत वरचढ दिसत आहे. राज्यसभेमध्ये काँग्रेसचे २७ आणि इंडी आघाडीचे एकूण खासदार ५८ आहेत. या व्यतिरिक्त काही लहान पक्षांचे खासदार आणि निवडक अपक्ष खासदार आहेत. पण या मंडळींनी वक्फ विधेयकाला विरोध करणार की पाठिंबा देणार हे जाहीर केलेले नाही.यात वायएसआर काँग्रेसचे नऊ, बिजू जनता दलाचे सात, अण्णाद्रमुकचे चार तसेच इतर तीन खासदार आहेत.

Recent Posts

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…

15 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

41 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

2 hours ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

2 hours ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

3 hours ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

3 hours ago