वॉशिंगटन : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून यान पृथ्वीवर परत आणल्याबद्दल भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी अंतराळातून परतल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि स्पेसेक्सचे मालक एलॉन मस्क यांचे आभार मानले. दोघांनीही नासाच्या अंतराळवीरांच्या सुरक्षिततेवर विश्वास व्यक्त केला. टेक्सासमधील जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सुनीता विल्यम्स यांनी पृथ्वीवर परतल्यानंतर पहिल्यांदा आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी त्यांनी, “पृथ्वीवर परत आल्यानंतर त्यांना बरे वाटत आहे. त्या सध्या पुनर्वसनातून जात आहे आणि नवीन आव्हानांसाठी सज्ज होत आहे. घरी परतताच मला माझ्या नवऱ्याला मिठी मारायची होती. मी सर्वात आधी ग्रिल्ड चीज सँडविच खाल्ले.” असे त्यांनी म्हटले. सुनीता पुढे म्हणाल्या, “अवकाशातून हिमालय आणि भारताच्या इतर भागांचे रंग पाहून मला फार आश्चर्य वाटले. दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी भारत पाहणे हा एक अविश्वसनीय अनुभव होता.” असे त्यांनी यावेळी सांगितले.
सुनीता विल्यम्स म्हणाल्या की, “जेव्हा त्या त्यांच्या जोडीदार विल्मोरसोबत अंतराळात अडकल्या होत्या तेव्हा ती ‘टनेल व्हिजन’सह काम करत होती आणि फक्त तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत होती. आम्हाला माहित नव्हते की पृथ्वीवर काय चालले आहे.” असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच अंतराळ संशोधनाच्या संदर्भात अंतराळ उद्योगाला अनेक उद्दिष्टे साध्य करायची आहेत. सुनीता विल्यम्स यांनी कबूल केले की अंतराळवीरांना दीर्घकाळ अंतराळात राहिल्यामुळे शारीरिक आव्हानांना तोंड द्यावे लागते. मात्र, पुनर्वसन कार्यक्रमांद्वारे या आव्हानांना तोंड देता येते. स्नायूंची कमकुवतपणा आणि हाडांची झीज कमी करण्यासाठी एक विशेषज्ञ टीम असल्याचे विल्मोर यांनी यावेळी सांगितले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…