Weather updates : मुंबई ठाण्यासह राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; १० जिल्ह्यांना यलो अलर्ट!

मुंबई : राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, ठाण्यासह विविध जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलक्या सरी कोसळण्याची शक्यता असून, ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३१ मार्च २०२५ रोजी पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि घाटमाथ्यांवर पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच १ एप्रिल २०२५ रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, अमरावती, बुलडाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



सध्या अनेक भागांत ढगाळ वातावरण असून, उष्णतेची तीव्रता वाढली आहे. कोकणातील शेतकरी विशेषतः आंबा, काजू आणि कडधान्य उत्पादकांना संभाव्य पावसामुळे नुकसान होण्याची भीती आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना पिके व काढणी केलेले उत्पादन सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.


वादळी वाऱ्याचा फटका बसू नये म्हणून नागरिकांनी तसेच पशुपालकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

उमेदवारीचा पत्ता नाही, पण सोशल मीडियावर प्रचाराची धावपळ सुरू

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत जाहीर होण्याची शक्यता असून आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे.

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड

मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील नाने पाडा नाल्यावरील पुलांची पुनर्बांधणी

मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिममधील नानेपाडा नाल्यावरील पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्विकास केला

भायखळ्यात इमारत खोदकामादरम्यान माती कोसळली

दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू मुंबई  : भायखळा पश्चिमेकडील हंस रोड परिसरात हबीब मेंशन इमारतीच्या पुनर्विकासाचे

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी