मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणजे प्रिया बापट व उमेश कामत… लग्नाआधी जवळपास ८ वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २०११ मध्ये प्रिया-उमेशने लग्नगाठ बांधली. मराठमोळ्या पद्धतीत या दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. हे सेलिब्रिटी कपल चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या जोडीने त्यांच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
प्रिया व उमेश यांनी हक्काचं नवीन घर घेतलं आहे. अभिनेत्रीने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा नव्या घरातील फोटो शेअर करत दिल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून प्रिया-उमेशच्या घरी इंटिरियरचं काम चालू होतं. तेव्हापासूनच या जोडप्याचं नवीन घर पाहण्याची चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर गुढीपाडव्याच्या फोटोंमध्ये प्रिया-उमेशच्या नव्या घराची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे.
प्रियाने आठवड्याभरापूर्वीच पोस्ट शेअर करत, “आमच्या नवीन घरातील पहिला गुढीपाडवा” असा उल्लेख केला होता. त्यामुळे या दोघांच्या चाहत्यांनी नव्या घरासाठी दोघांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तिचं नवीन घर पाहण्यासाठी चाहते उत्सुक असल्याच्या कमेंट्स देखील करण्यात आल्या आहेत.
प्रिया-उमेशचं २०११ मध्ये लग्न झाल्यावर या जोडप्याने नवीन घर खरेदी केलं होतं. याबद्दल उमेश कामत जुन्या मुलाखतीत म्हणाला होता, “२०११ साली माझं आणि प्रियाचं लग्न झालं. त्यानंतर आम्ही घर घेतलं. घर घेतल्यावर आमचा बँक बॅलन्स शून्य झाला होता. यानंतर मात्र आर्थिक घडी पुन्हा व्यवस्थित बसवण्यासाठी आम्ही पुन्हा जोमाने काम करु लागलो. पण स्व:कष्टातून मुंबईत स्वत:चं घर घेतल्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही.”
दरम्यान, प्रिया बापट व उमेश कामत यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर या दोघांनी अनेक चित्रपट व मालिकांमध्ये एकत्र काम केलेलं आहे. सध्या ही जोडी रंगभूमीवरील ‘जर तरची गोष्ट’ या नाटकात एकत्र काम करत आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…