Gulkand Marathi Movie : 'गुलकंद' मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : काही दिवसांपूर्वी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेटक्लाऊड प्रोडक्शन निर्मित 'गुलकंद' मधील 'चंचल' हे गोड प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. 'चंचल' गाण्याला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीनंतर चित्रपटातील दुसरं गाणं 'चल जाऊ डेटवर' प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गंमतीदार अंदाजातील या गाण्याचे बोल, संगीत प्रेक्षकांना नक्कीच भावेल. हे गाणं ऐकायला जितकं छान आहे, तितकंच त्याचं सादरीकरणही अप्रतिम आहे. वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या कमाल आवाजातील या गाण्याला प्रशांत मडपूवार यांच्या शब्दांची व अविनाश विश्वजीत यांच्या जबरदस्त संगीताची जोड लाभली आहे.


गाण्यात सई आणि समीरची भन्नाट केमिस्ट्री दिसत असून समीर आणि सईचे नृत्य एक सरप्राईज आहे. सई समीरची ही ढवळे फॅमिली कुठे आणि कशी डेटवर जाणार आणि तिथे काय धमाल होणार, याची उकल १ मे २०२५ ला गुलकंद प्रदर्शित झाल्यावर होणार आहे. तोवर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचेल हे नक्की!



दिग्दर्शक व निर्माते सचिन गोस्वामी म्हणतात, "या गाण्यातील सई, समीर आणि प्रसाद, ईशा यांची केमिस्ट्री मजेशीर असून प्रेक्षकांना हसवणारी आहे. गाण्याचे बोल, संगीत सगळंच खूप छान आहे. एक वेगळाच मूड बनवणारं हे गाणं असल्यानं त्याचं चित्रीकरण तसंच होणं गरजेचं होतं. मस्त कलरफुल ठिकाणी चित्रित करण्यात आलेलं हे गाणं संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल. गाण्यात सई -समीर जरी डेटवर जात असल्याचे दिसत असले तरी १ मे रोजी सर्वांनी आपल्या कुटुंबियांसह ही डेट एन्जॉय करावी.’’


निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, "चित्रपट यशस्वी करण्यात गाण्यांचा मोठा सहभाग असतो. कधी कधी कथेतून जी गोष्ट, भावना मांडता येत नाहीत त्या गाण्यातून मांडता येतात. असंच हे गंमतीशीर गाणं आहे. हे या चित्रपटातील दुसरं गाणं आहे. पहिले गाणं रोमँटिक होते, हे गाणं अतिशय एनर्जेटिक असून प्रत्येकाला थिरकायला लावणारे आहे. चित्रपट पाहातानाही प्रेक्षक हे गाणं अतिशय एन्जॉय करतील.''


सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांसारखे तगडे कलाकार आहेत. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis On Raj Thackeray : राज ठाकरे इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील; फडणवीसांनी मांडलं पराभवाचं गणित, ठाकरेंच्या 'वारशा'वरही ओढले ताशेरे

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी चक्क त्यांच्या राजकीय

निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अनुषंगाने गुरुवार, l १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक सीओआरएस स्टेशन उभारणार

भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार मुंबई : देशातील भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण

वांद्र्यांतील रस्ते विकास महामंडळाच्या मुख्यालयावर फेब्रुवारीत हातोडा

पुनर्विकासातून ८ हजार कोटींचा महसूल अपेक्षित मुंबई : वांद्रे रेक्लेमेशन येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

उमेदवारांना अनावश्यक 'एनओसी'ची सक्ती का?

जनहित याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी मुंबई : गरज नसतानाही निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबईतील काही ठिकाणी मतदान केंद्रांत बदल

राजकीय पक्षांसह उमेदवारांना माहिती देण्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांचे निर्देश मुंबई : मुंबई