Vodafone Idea share : व्होडाफोन आयडिया कंपनीला केंद्र सरकारने दिले जीवनदान

  88

नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार क्षेत्रात सध्या जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आणखी तगडे खेळाडू उतरावे आणि ग्राहकांना वाजवी दरात सेवा उपलब्ध व्हावी या हेतूने केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून बीएसएनएल या सरकारी कंपनीचे पुनरुज्जीवन करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. पाठोपाठ सरकारने व्होडाफोन आयडिया या खासगी कंपनीला जीवनदान दिले आहे.



बीएसएनएल ही १०० टक्के सरकारी मालकीची कंपनी आहे. ही कंपनी सध्या वाजवी दरातले आकर्षक प्लॅन सादर करुन अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीने ४२५ दिवसांसाठी २३९९ रुपयांचा एक आकर्षक प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनची तसेच इतर प्रीपेड प्लॅनची माहिती बीएसएनएलच्या अधिकृत वेबसाईटवर Prepaid Plans अंतर्गत उपलब्ध आहे. बीएसएनएल स्पर्धेत उतरत असतानाच केंद्र सरकारने व्होडाफोन आयडिया या खासगी कंपनीला जीवनदान दिले आहे. सरकारने स्पेक्ट्रम लिलावाच्या थकबाकीच्या बदल्यात कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या टेलिकॉम ऑपरेटरमधील अधिक हिस्सा घेण्यास सहमती दर्शवून व्होडाफोन आयडिया लिमिटेडला जीवनदान दिले आहे. या जीवनदानामुळे व्होडाफोन आयडिया कंपनीची स्पेक्ट्रम थकबाकीतून सुटका झाली आहे.



एक्सचेंज फाइलिंगनुसार, व्होडाफोन आयडियाला नियामक मंजुरी मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत १० रुपये दर्शनी मूल्याचे तीन हजार ६९५ कोटी इक्विटी शेअर्स जारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित होणारी एकूण रक्कम ३६ हजार ९५० कोटी रुपये आहे. इक्विटी शेअर्स जारी केल्यानंतर, कंपनीतील भारत सरकारचा हिस्सा सध्याच्या २२.६० टक्क्यांवरुन ४८.९९ टक्क्यांवर पोहोचणार आहे. सरकारी गुंतवणुकीत वाढ झाली तरी प्रमोटर्सकडे कंपनीचे ऑपरेशनल नियंत्रण राहणार आहे. याआधी सरकारने फेब्रुवारी २०२३ मध्ये व्होडाफोन आयडियाला १६ हजार १३३ कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स जारी करण्याची परवानगी दिली होती. या शेअर्सद्वारे थेट गुंतवणूक करुन सरकारने कंपनीत गुंतवणूकदार म्हणून प्रवेश केला होता.
Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.