New Bank Rules From 1st April 2025 : एक एप्रिल पासून नेमके काय बदल होणार?

१ एप्रिलपासून होणार महत्त्वाचे आर्थिक बदल


मुंबई : दर महिन्याच्या सुरुवातीला काही आर्थिक नियम बदलतात. (New Bank Rules From 1st April 2025) काही आपल्या फायद्याचे, तर काही थोडे गैरसोयीचे. पण एप्रिल महिना म्हणजे आर्थिक वर्षाची सुरुवात! त्यामुळे यावेळी होणारे बदल अधिक महत्त्वाचे ठरणार आहेत. (New Banking Rules In India) यूपीआय पेमेंटसंबंधी नवीन नियम लागू होणार आहेत, बँक खात्यातील मिनिमम बॅलन्स बदलणार आहे, एटीएममधून पैसे काढणं महाग होणार का, पॉझिटिव्ह पे सिस्टीम म्हणजे नक्की काय, आरबीआयने (Reserve Bank of India) कोणता नवीन निर्णय घेतलाय. एक एप्रिल पासून नेमके असे कोणते मोठे बदल होणार आहेत. या सगळ्या बदलांविषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.



आजकाल पाच रुपयांचं बसभाडं द्यायचं असो किंवा हजारोंची खरेदी करायची असो, पेमेंटच्या वेळी आपला हात थेट मोबाईलकडे जातो आणि एका क्लिकवर यूपीआय ॲप्सद्वारे पेमेंट केलं जातं. पण जर तुमच्या यूपीआय अकाउंटला इनॲक्टिव्ह मोबाईल नंबर जोडलेला असेल, तर १ एप्रिलपासून तुम्हाला पेमेंट करण्यास अडचण येऊ शकते.



New Banking Rules In India : इनॲक्टिव्ह नंबर म्हणजे काय?


जर तुम्ही तुमच्या सिम कार्डचा ९० दिवसांपेक्षा जास्त काळ रिचार्ज केला नसेल, तर टेलिकॉम कंपन्या तो नंबर बंद करून दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकतात. पण जर हा बंद झालेला नंबर यूपीआय अकाउंटशी लिंक असेल, तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते. यामुळेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने बँकांना आदेश दिले आहेत की ३१ मार्चपूर्वी अशा नंबरशी जोडलेली यूपीआय खाती डिऍक्टिव्ह करावीत. त्यामुळे तुमचा यूपीआय नंबर सक्रिय आहे का, हे तपासणं आता आवश्यक आहे. यूपीआय सेवा बंद होऊ नये यासाठी युजर्सना आता कायम त्यांचा यूपीआय किंवा बँक खात्याशी कनेक्ट असलेला मोबाईल नंबर ऍक्टिव्ह आणि अप टू डेट ठेवावा लागणार आहे.



New Banking Rules In India : मिनिमम बॅलन्सच्या नियमांमध्ये बदल


१ एप्रिलपासून काही मोठ्या बँका त्यांच्या मिनिमम बॅलन्सच्या नियमांमध्ये बदल करत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक या बँकांनी त्यांच्या खात्यांमध्ये ठेवाव्या लागणाऱ्या किमान शिल्लक रकमेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरी आणि निमशहरी भागांमध्ये बॅलन्सच्या मर्यादा वेगळ्या असतील आणि जर खात्यात ठराविक शिल्लक नसेल, तर दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या खात्यातील शिल्लक तपासून आवश्यक ती रक्कम कायम ठेवणं गरजेचं आहे.



बँकिंग क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठ्या प्रमाणात वापर


बँकिंग क्षेत्रात आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार आहे. बँका डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन अनिवार्य करत आहेत. को-फॅक्टर ऑथेंटिकेशनच्या मदतीने यूपीआय आणि इतर ऑनलाइन व्यवहार अधिक सुरक्षित केले जातील. बँका एआय चॅटबॉट्सचा वापर करून ग्राहकांच्या समस्या सोडवणार आहेत. पण यामुळे प्रत्यक्ष बँकेत जाऊन करावं लागणारं काम कमी होईल का, की नव्या प्रणालींमुळे आणखी अडचणी निर्माण होतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.



New Banking Rules In India : पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू केली जाणार


१ एप्रिलपासून पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू केली जाणार आहे. जर तुम्ही पाच हजार किंवा त्यापेक्षा मोठ्या रकमेचा चेक भरत असाल, तर त्या चेकच्या डिटेल्स आधीच बँकेला कळवाव्या लागतील. चेक नंबर, तारीख, रक्कम आणि लाभार्थ्याचं नाव बँकेकडे नोंदवणं बंधनकारक असेल. या प्रक्रियेमुळे चेक बाउन्स होणं, फसवणुकीचे प्रकार आणि व्यवहारातील चुका टाळता येतील. जरी हा बदल थोडा वेळखाऊ वाटत असला, तरी व्यवहार अधिक सुरक्षित होतील.



New Banking Rules In India : एटीएम इंटरचेंज फी वाढवण्याचा घेतला निर्णय 


यूपीआय आणि डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी आणि रोख व्यवहार कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एटीएम इंटरचेंज फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इंटरचेंज फी म्हणजे एका बँकेकडून दुसऱ्या बँकेच्या एटीएम सेवेसाठी आकारली जाणारी रक्कम. जर तुम्ही तुमच्या बँकेशिवाय इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढले, तर ठरावीक संख्येनंतर तुम्हाला या वाढलेल्या चार्जेसचा फटका बसू शकतो. आर्थिक व्यवहारांसाठी इंटरचेंज फी १७ रुपयांवरून १९ रुपये केली जाणार आहे, तर गैरआर्थिक व्यवहारांसाठी ती ६ रुपयांवरून ७ रुपये केली जाईल. हा बदल १ मेपासून लागू होणार असला, तरी त्याचा सर्वसामान्य ग्राहकांवर किती परिणाम होईल, हे पाहणं गरजेचं आहे.



New Banking Rules In India : बचत खाते आणि एफडी व्याजदरांमध्ये बदल


अनेक बँका बचत खाती आणि मुदत ठेवींवरील व्याजदरांमध्ये सुधारणा करत आहेत. बचत खात्यावरील व्याज आता खात्यातील शिल्लक रकमेवर अवलंबून असेल, म्हणजेच जास्त शिल्लक रकमेवर चांगले दर मिळू शकतात. या समायोजनांचा उद्देश स्पर्धात्मक परतावा देणे आणि बचतीला प्रोत्साहन देणे आहे.



New Banking Rules In India : सुधारित क्रेडिट कार्ड फायदे


एसबीआय आणि आयडीएफसी फर्स्ट बँकसह प्रमुख बँका त्यांच्या सह-ब्रँडेड विस्तारा क्रेडिट कार्डमध्ये बदल करत आहेत. तिकीट व्हाउचर, नूतनीकरण भत्ते आणि माइलस्टोन रिवॉर्ड्ससारखे फायदे बंद केले जातील. अ‍ॅक्सिस बँक १८ एप्रिलपासून अशाच प्रकारचे बदल लागू करेल, ज्यामुळे त्यांच्या विस्तारा क्रेडिट कार्डधारकांवर परिणाम होईल.

Comments
Add Comment

Uttarakhand Train Accident : ऋषिकेशमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला! उज्जयनी एक्सप्रेसचे ३ डब्बे रुळावरून घसरले

ऋषिकेश : उत्तराखंडमधील ऋषिकेश (Uttarakhand Train Accident) येथे उज्जयनी एक्सप्रेसशी संबंधित धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेशन

Stray Dog Menace : रस्त्यांवरील कुत्र्यांचा प्रश्न अखेर सुटणार ? नागरिकांची सुरक्षा की प्राण्यांचे हक्क, आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे देशाचे लक्ष

नवी दिल्ली : देशभरातील गल्लीबोळांमध्ये आणि रस्त्यांवर वाढलेली भटक्या कुत्र्यांची संख्या आणि त्यांच्याकडून

Petrol Diesel Price Hike : सर्वसामान्यांना पुन्हा झटका! पेट्रोल-डिझेलच्या दरात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे (Petrol Diesel Price Hike) सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा मोठा फटका बसला आहे.

Mumbai-Ahmedabad Bullet Train : प्रतीक्षा संपली! देशातील पहिल्या 'बुलेट ट्रेन'ची पहिली झलक आली समोर; दिल्लीत झळकावले चित्र

नवी दिल्ली : भारतातील बहुचर्चित आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन' (Mumbai-Ahmedabad Bullet Train)

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक

Dubare Elephant Camp : थरकाप उडवणारी घटना! कर्नाटकातील दुबारे हत्ती कॅम्पमध्ये दोन हत्तींच्या झुंजीत महिला पर्यटकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू

कर्नाटकातील कोडागू जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या 'दुबारे एलिफंट कॅम्प' (Dubare Elephant Camp) मध्ये एक अत्यंत