Apple : डेटा गोपनीयता प्रकरणात अ‍ॅपलला १५ कोटी युरोपेक्षा अधिकचा दंड

नवी दिल्ली : आयफोन उत्पादक अ‍ॅपल कंपनी (Apple Company) आपल्या प्रायव्हसी पॉलिसीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. आयफोन वापरकर्त्यांची माहिती गोपनीय ठेवली जाते, असा कंपनीचा दावा आहे. मात्र, याच मुद्द्यावर (data privacy case) आता अ‍ॅपल वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, फ्रान्सच्या स्पर्धा नियामकाने कंपनीवर १५ कोटी युरोपेक्षा जास्तीचा दंड ठोठावला आहे.


हे प्रकरण एप्रिल २०२१ ते जुलै २०२३ या काळातील असून, iOS आणि iPad डिव्हाइसेसवर मोबाईल ऍप्लिकेशन्सच्या वितरणामध्ये अ‍ॅपलने आपल्या वर्चस्वाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. iPhone मधील ‘अ‍ॅप ट्रॅकिंग ट्रान्सपरन्सी (ATT)’ हे टूल वापरकर्त्यांना त्यांच्या डेटाच्या संकलनासाठी संमती देण्याची किंवा नाकारण्याची सुविधा देते. परंतु, हेच टूल अ‍ॅपलच्या स्वतःच्या प्रायव्हसी धोरणाच्या विरोधात कार्यरत असल्याचे फ्रान्सच्या नियामकांचे म्हणणे आहे.



स्पर्धा नियामकाने अ‍ॅपलला ATT मध्ये कोणतेही बदल करण्याचे आदेश दिले नाहीत, परंतु त्यांच्या निर्णयात असे नमूद केले की, हे टूल वापरकर्त्यांच्या गोपनीयतेच्या उद्दिष्टांविरोधात जाते. ऑनलाइन जाहिरातदार, प्रकाशक आणि इंटरनेट नेटवर्क्सनी अ‍ॅपलच्या धोरणांवर टीका केली असून, कंपनीने आपल्या बाजारातील शक्तीचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.


अ‍ॅपलने फ्रेंच नियामकाच्या या निर्णयाबद्दल निराशा व्यक्त केली असून, गोपनीयता नियंत्रण साधनांमध्ये कोणत्याही महत्त्वाच्या बदलांची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

विमानात मोठ्या आवाजात गाणी ऐकणार तर......; विमान वाहतूक मंत्रालयाने जारी केले नवे नियम

मुंबई : लांबच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी आजकाल सर्रास विमानांचा वापर केला जातो. ट्रेन किंवा बसने प्रवास करताना

बांगलादेश निवडणुकीत बीएनपीचा विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

दिल्ली: बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुकीने देशाच्या राजकारणाचा मार्ग बदलून टाकला आहे. बीएनपीने (बांगलादेश

Bengaluru: अंधश्रद्धेच्या पायात घेतला आईचा बळी, ज्योतिषाच्या दाव्यानंतर रचला हत्येचा कट

मुंबई: कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात अंधश्रद्धमधून एक भयावह घटना घडली आहे. आपल्या वडिलांच्या निधनाला आईचं

दूरदर्शनच्या लोकप्रिय वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे निधन

नवी दिल्ली : दूरदर्शनच्या प्रसिद्ध वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे वयाच्या ७१व्या वर्षी निधन झाले.

पंतप्रधानांच्या हस्ते आज सेवा तीर्थ, कर्तव्य भवनाचे उद्घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी 'सेवा तीर्थ' आणि 'कर्तव्य भवन-१ आणि २'चे उद्घाटन करणार आहेत. नव्याने

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याची मागणी

नवी दिल्ली : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधींच्या संसद