Bengaluru: अंधश्रद्धेच्या पायात घेतला आईचा बळी, ज्योतिषाच्या दाव्यानंतर रचला हत्येचा कट

मुंबई: कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात अंधश्रद्धमधून एक भयावह घटना घडली आहे. आपल्या वडिलांच्या निधनाला आईचं जबाबदार आहे आणि तिने करणी ( 'ब्लॅक मॅजिक') केली होती. या संशयावरून मुलीने आईची निर्घृण हत्या केली आहे. पुष्पावती असे मृत महिलेचे नाव असून, तिच्या ३३ वर्षीय सुचित्रा नावाच्या मुलीला पोलिसांनी अटक केली आहे.



ज्योतिषाच्या दाव्यानंतर रचला हत्येचा कट



सुचित्रा ही तुमकूर शहरात आपल्या पतीसोबत राहत होती. सुमारे १८ महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनाचे दुःख पचवू न शकलेल्या सुचित्राने एका ज्योतिषाचा सल्ला घेतला. ज्योतिषाने सुचित्राला सांगितले की, तिच्या वडिलांचा मृत्यू नैसर्गिक नसून तिच्या आईने केलेल्या करणीमुळे झाला आहे. या शब्दांवर आंधळा विश्वास ठेवून सुचित्राने आईच्या घरी जाऊन, ती गाढ झोपेत असताना उशीने तिचे तोंड दाबून तिची हत्या केली.



पोलीस घटनास्थळी पोहोचताच...



आईची हत्या केल्यानंतर सुचित्राने हे प्रकरण नैसर्गिक मृत्यूचे असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. पुरावे नष्ट करण्यासाठी तिने घाईघाईने अंत्यसंस्काराची तयारीही सुरू केली. परंतु पुष्पावती यांचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार थांबवले. गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सुचित्राची चौकशी केली असता, तिने आपला गुन्हा कबूल केला.


याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून सुचित्राच्या पतीलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या हत्येच्या कटात पतीचा सहभाग होता का, किंवा त्याला याबद्दल माहिती होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. ज्या ज्योतिषाने सुचित्राला प्रवृत्त केले, त्याचाही शोध पोलीस घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

Comments
Add Comment

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात 100 वर्षे जुने घर कोसळले; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात मध्यरात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेत 100 वर्षे जुने घर कोसळून

Devendra Fadnavis Gen Z : तरुणांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस सरकारचा 'मास्टरप्लॅन'; 'जेन Z' साठी ९ मोठे निर्णय ठरणार गेमचेंजर!

मुंबई : राज्यातील तरुण पिढी, विशेषतः 'जेन Z' (Gen Z) म्हणजेच नव्या युगातील युवक-युवतींमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता

Indian Space Station : 2035 पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक; गगनयान मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात

मुंबई : भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांना वेग आला असून, 2035 पर्यंत देशाचे स्वतःचे अंतराळ स्थानक (भारतीय

India Weather : मुसळधार पाऊस थांबायचं नाव घेईना! देशातील 17 राज्यांना हाय अलर्टचा इशारा; आसाममधील पूरस्थिती गंभीर

मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः

Central government plan on LPG LNG : आता हे काय नवीन ? एलपीजी अन् एलएनजीच्या आपत्कालीन साठ्यासाठी ग्राहकांवर कर ? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

भारतातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि इंधनाचा आपत्कालीन साठा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ४२ अब्ज डॉलर

Central Government Operation Trishul : मोदी सरकारची मोठी कारवाई! 7 वर्षांत 36 देशांतून 274 फरार गुन्हेगार भारतात परत; 'ऑपरेशन त्रिशूल'ने वाढवली तपास यंत्रणांची ताकद

नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, 2019 ते 2026 या