Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १६ ते २२ फेब्रुवारी २०२५

Share

साप्ताहिक राशिभविष्य, १६ ते २२ फेब्रुवारी २०२५

रखडलेली कामे मार्गी लागतील

मेष :धार्मिक प्रवासाच्या योजना आखाल. त्यासाठी खर्चात वाढ झालेली दिसेल. सर्व कुटुंबाचा सहभाग आनंद देणारा ठरेल. दानधर्मासाठी खर्च कराल. जोडीदाराच्या सहकार्यासाठी पूरक राहा. उद्योग व्यवसायासाठी विशेष श्रम घेतल्यास नियोजन यशस्वी झालेली दिसेल. आरोग्याविषयी फारशी चिंता नसेल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होऊ शकतात. दुरावलेले मित्र पुन्हा जवळ येऊ शकतात. गुढ शास्त्राच्या अभ्यासात प्रगती साधाल. रखडलेली कामे मार्गी लागतील. शुभ समाचार मिळतील. नव्या योजना अंमलात आणू शकाल. जमीन-जुमला यांची प्रलंबित असलेली कामे मार्गावर येतील. काही कारणास्तव केलेले प्रवास सफल होतील. स्थायी संपत्तीच्या दृष्टीकोनातून काही बदल संभवतात.

अधिकार, सन्मान, प्रसिद्धी मिळू शकते

वृषभ : आपल्या कार्यक्षेत्रात पद, अधिकार, प्रतिष्ठा, सन्मान, प्रसिद्धी मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहाल. परोपकारी वृत्ती राहील. सर्वांना मदतीचा हात द्यावा. प्रसिद्धीचे योग आहेत. धार्मिकतेमध्ये रस निर्माण होईल. समाजातील सन्माननीय व्यक्तींचे मार्गदर्शन त्या जोरावर मदत मिळेल. नोकरीविषयक प्रश्न सुटतील. बेरोजगारांना रोजगार मिळतील. जुनी नोकरी सोडून नवीन नोकरी मिळू शकते, पण त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आवश्यक आहे. कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. व्यवसाय-धंद्यात परदेशी संबंध येऊ शकतो. आपल्या मौल्यवान वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे व्यवस्थित ठेवा. घरातील वातावरण सुखद राहील. प्रवासात मात्र विशेष काळजी घ्यावी लागेल. आर्थिक बाब चांगली राहील.

कामे सफल होतील

मिथुन : सध्याचे ग्रहमान प्रगतीसाठी तसेच उन्नतीसाठी अनुकूल राहील. उद्योग व्यवसायात धडाडीने काम कराल. नव्या व्यवहारात उत्तम प्रगती साधू शकाल. नोकरीतही कर्तृत्वाची साथ लाभेल. आपले कार्य कौशल्य कौतुकास्पद असेल. संततीची अभ्यासात प्रगती झालेली बघून समाधान वाटेल. विद्यार्थ्यांना गुरुजनांचा सर्वस्व मार्गदर्शन मिळेल. तसेच कुसंगत टाळावे. वैवाहिक सौख्यात कुरबुरी चालू राहतील. जोडीदाराच्या प्रकृती स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. खर्चामध्ये वाढ होईल. कोर्टकचेरीच्या कामामध्ये लक्ष द्यावे लागेल. शत्रूंच्या कारवाया चालू राहतील पण तुम्ही त्यांना चोख उत्तर द्यावे. युक्ती प्रयुक्तीने आपण त्यावर विजय संपादित करू शकाल. आपली बहुतेक क्षेत्रातील कामे सफल होतील.

कायदेशीर कामात यश मिळेल

कर्क : काही वेळेस काही घटना आपल्या मनाविरुद्ध घडतील. काही अप्रिय निर्णय वेळीच स्वीकारावे लागतात आपल्या म्हणून विरुद्ध काही घटना घडल्याने येणाऱ्या काळासाठी आपण मनात साशंक असाल. व्यवसाय- धंद्यासंबंधी काही समस्या असून त्या सोडवण्यासाठी आपल्याकडून फारसे काही होत नाही असे वाटेल; परंतु आपण आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर व आत्मविश्वास आवर्ती व परमेश्वरावर विश्वास ठेवून या परिस्थितीवर दोन हात करू शकता. कायदेशीर कामात यश मिळेल. यश आपलेच आहे. मात्र धिम्यागतीने परिस्थितीत सुधारणा होऊन सफल व्हाल. कुटुंबातील धार्मिक कार्य आनंदाने पार पडेल. प्रतिष्ठा वाढेल.

उत्पन्न वाढेल

सिंह : उद्योग-व्यवसायातील अडीअडचणींवर मार्ग काढण्यात यश मिळेल. मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे आपण सर्व प्रकारच्या समस्यांवरती मात करू शकाल. शत्रूंवर विजय मिळवाल. उत्साही व हरहुन्नरी राहाल. जास्तीचे कष्ट घेण्याची तयारी असेल. नवीन आव्हाने स्वीकाराल. जिद्द व चिकाटीने पुढे नेत मार्गक्रमण कराल. आपल्या कार्याची अथवा कार्यशैलीची प्रशंसा होईल. नोकरी-व्यवसायात आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडेल. कार्याची व्याप्ती वाढल्यामुळे श्रमही वाढणार आहेत. उत्पन्न वाढेल. व्यवसाय-धंद्यात उलाढाल वाढलेली दिसेल. नातेवाईक व भावंडांचे सौख्य लाभणार आहे.

धन आगमन होईल

कन्या : कुटुंबात शुभकार्य होण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. कुटुंबात मंगलकार्ये अथवा शुभ कार्य घडतील. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहील. कुटुंब परिवारातील ज्येष्ठ व्यक्तींच्या सूचनांचा आदर आपण कराल. विविध खरेदी होईल. कुटुंबात धार्मिक वातावरण राहील. विविध वस्त्रालंकार यासाठी खर्च होईल. सर्वांच्या मागण्या पूर्ण कराल. खर्च वाढला असला तरी विविध मार्गातून धन आगमन होईल. हे दिवस आपणासाठी चैतन्याने भरलेले असतील. आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या. अनपेक्षित भेटवस्तू मिळू शकतील.

सहकार्य मिळणार आहे

तूळ : या दिवसात काही दिवस आपणासाठी सुखकारक असणार आहे. आपणाला आपल्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार आहे. आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. घरातील काही व्यक्तींच्या वागण्याने आपल्याला मनस्ताप होऊ शकतो. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने हे दिवस आपणाला उत्तेजना पूर्ण असतील. नवीन उपक्रम, उद्योग हे आकर्षक आणि योग्य फायदा मिळण्यासाठी आशादायी असतील. ज्या व्यक्तीच्या सहवासाने आपल्या प्रतिष्ठेला बाधा ठरू शकते, अशा व्यक्तींचा सहवास टाळा. आपणाला आपल्या जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य मिळणार आहे. हा कालावधी आपणासाठी समृद्धीचा असणार आहे.

प्रगतीपर सुवार्ता समजतील

वृश्चिक : कुटुंब परिवारातील मुला-मुलींकडून त्यांच्या प्रगती पर सुवार्ता समजतील. त्यांचे अभ्यास व खेळ क्षेत्रात चांगली प्रगती होईल. शिक्षण नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशी जाण्याची संधी मिळून उच्चशिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. त्या कामी गुरुजन तसेच इतरांची मदत मिळू शकते. कुटुंबामध्ये एखादे धार्मिक कार्य होऊ शकते. व्यवसाय धंद्यातील परिस्थिती सर्वसामान्य राहील. नोकरी, व्यवसाय, धंद्यानिमित्त मोठे प्रवास घडू शकतात. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर सत्कार होईल; परंतु लहानसहान कारणांवरून वाद-विवाद घडू शकतात. ते टाळावेत.

आर्थिक स्थिती मजबूत राहील

धनू : आर्थिक स्थिती मजबूत राहील. विविध मार्गांनी धनलाभ होतील. मालमत्तेची कामे फायद्यात राहतील. आर्थिक लाभ संभवतो. विविध मार्गांनी धनलाभ होईल. व्यवसायात महत्त्वाची कामे पार पाडू शकाल. नवीन करार होऊ शकतात. जुनी येणी वसूल होतील मात्र वसुली करताना वाद-विवाद सांभाळा. थोडी काळजी घेणे आवश्यक राहील. कुटुंब परिवारात वातावरण चांगले राहील. जीवनसाथीची साथ मिळेल. मुलांकडून शुभ समाचार मिळतील. नोकरीत बदलीची किंवा कामात बदल होण्याची शक्यता आहे.

सरकारी कामात यश मिळेल

मकर : नोकरी, व्यवसाय, धंद्यानिमित्य जवळच्या तसेच दूरच्या प्रवासाचे योग आहेत. प्रवासामध्ये आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण आवश्यक राहील. तसेच आपल्या मौल्यवान वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवा. सरकारी कामात यश मिळेल. तसेच आपले वाहन सुरक्षित ठिकाणी ठेवा. वाहनाच्या वेगावरती नियंत्रण हवे. भावंडांच्या भेटीगाठी होऊ शकतील. कुटुंबातील वातावरण सर्वसामान्य राहील. काही वेळेस आपल्या मनाविरुद्ध घटना घडू शकतात. मुलांकडून अपेक्षा भंग होण्याची शक्यता. आपण शांतपणे निर्णय घेऊन वेळ पडल्यास मुलांशी चर्चा करून समस्या सोडवू शकाल. मुलांच्या बाबतीत अतिआत्मविश्वास टाळा. आर्थिक फायदे होतील.

कौटुंबिक सुख मिळेल

कुंभ : कौटुंबिक सौख्यासाठी आपणास हा काळ अनुकूल आहे. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास आपणास खरे समाधान मिळू शकेल. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण केल्यामुळे आपल्याला समाधान लाभेल. आपल्या बोलण्यातून आत्मविश्वास दिसून येईल. कुटुंबात आपल्या मताला प्राधान्य दिले जाईल. नोकरी-व्यवसायात आपण याअगोदर केलेल्या कामाचे फळ मिळेल. पदोन्नती वेतन वृद्धिचे योग आहेत. मात्र बदलीची तयारी ठेवा. वरिष्ठ आपल्या कामावरती खूश राहतील. एखादी विशेष प्रकारची नवीन जबाबदारी स्वीकारावी लागण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. व्यवसाय धंद्यातील दीर्घकाळ रखडलेली रक्कम वसूल होईल.

कठीण समस्या सहजगत्या सोडवाल

मीन :आपण आपल्या बुद्धिकौशल्यद्वारे कठीण समस्या सहजगत्या सोडवाल. कौटुंबिक पातळीवरही आणि आपल्या कार्यक्षेत्रात हे आपल्याला यश मिळणार आहे. पोलीस दलातील किंवा डिफेन्समध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना साहसंपूर्ण कार्य करण्यासाठी सन्मान होण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्ती स्पर्धा परीक्षांना बसणार आहे त्यांना चांगले यश मिळून, सरकारी नोकरी प्राप्त होण्याची शक्यता आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीत सहज साध्य यश मिळणार आहे. आपल्या अधिकारात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र वैवाहिक जीवनात चढ उताराची परिस्थिती असू शकते. नोकरी करणाऱ्या महिलांना कामाचे नियोजन करावे. तरीही ताण येण्याची शक्यता आहे.

Recent Posts

Shivneri Fort : शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा पाचव्यांदा पर्यटकांवर हल्ला!

पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…

1 minute ago

पोप फ्रान्सिस ८८ व्या वर्षी ख्रिस्तवासी

व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…

47 minutes ago

Beautiful Anklets : चांदीच्या अँकलेटचे सुंदर ८ डिझाईन्स पहा!

महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…

1 hour ago

Devmanus Film : ‘देवमाणूस’ चित्रपटातील ’सोबती’ गाणे प्रदर्शित

मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…

1 hour ago

घरातच घडली धक्कादायक घटना, पत्नीने केली माजी पोलीस महासंचालकांची हत्या

बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…

1 hour ago