Friday, May 9, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

NAMO SHETAKARI : 'नमो शेतकरी योजने'चा सहावा हप्ता ३१ मार्चपूर्वी बँक खात्यात जमा होणार

NAMO SHETAKARI : 'नमो शेतकरी योजने'चा सहावा हप्ता ३१ मार्चपूर्वी बँक खात्यात जमा होणार
मुंबई : महाराष्ट्रातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची दोन हजार १६९ कोटी रुपये लाभाची रक्कम डीबीटीसंलग्न सक्रिय बँक खात्यात ३१ मार्चपूर्वी जमा करण्यात येईल, असे राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.



शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना फेब्रुवारी २०१९ पासून सुरू केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबांस (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) २००० रुपये प्रतिहप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी ६,००० रुपये त्यांच्या आधार व डीबीटीसंलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत. या योजनेमध्ये पीएम किसान योजनेच्या प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी ६ हजार रुपयाच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन सहा हजार रुपयांची भर घालते. आजवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत ५ हप्ते वितरित केले असून ९०.८६ लाख शेतकरी कुटुंबांना ८९६१.३१ कोटी रुपयांचा लाभ बँक खात्यात जमा केला आहे.



पंतप्रधानांच्या हस्ते डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीतील योजनेचा १९वा हप्ता वितरित करण्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये ९२.८९ लाख शेतकरी कुटुंबांना एकूण १,९६७.१२ कोटी रुपये निधीचा लाभ वितरित करण्यात आले आहेत. केंद्र शासनाने पीएम किसान योजनेंतर्गत एकूण ६५ हजार ०४७ लाभार्थींना लाभ दिला आहे.
Comments
Add Comment