राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह, अनेक ठिकाणी शोभायात्रा

मुंबई: हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा. चैत्र महिन्यातील पहिला दिवस हा गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते.चैत्र महिन्यापासून मराठी नववर्षाला सुरूवात होते. या नववर्षाचा उत्साह राज्यभरात पाहायला मिळत आहे. शिशिर ऋतूतील पानगळ संपलेली असते, सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आणि उगवत्या वर्षाचे स्वागत करायचं. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं.


यावर्षी राज्यभरात अनेक ठिकाणी नववर्षाच्या स्वागतासाठी भव्य स्वागतयात्रा काढल्या जातात. या शोभायात्रांमध्ये तर तरूणाईचा उत्साह ओसंडून वाहत असतो. ढोल-ताशांच्या गजरात, भव्य मिरवणूक काढून नववर्षाचे उत्साहाने स्वागत केले जाते. यावेळी सगळेचजण पारंपारिक वेशभूषा करतात. डोंबिवली, गिरगाव, पुणे तसेच अनेक ठिकाणी ही शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढली जाते.


गुढीपाडव्याचा मुहूर्त म्हणजे साडेतीन मुर्हूंतांपैकी एक मानला जातो. या दिवशी मोठी खरेदीही केली जाते. सोने-चांदी खरेदीलाही ग्राहकांची मोठी गर्दी असते. नववर्षाच्या मुहूर्तावर सोने, चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू वाहन व घर घेण्याकडे देखील नागरिकांचा कल दिसून येतो.

Comments
Add Comment

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध