Gudi Padwa 2025 : चिरायू २०२५ सोहळ्यात उभारली 'गोधडीची गुढी'!

  85

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या ‘गुढीपाडवा’ (Gudi Padwa 2025) या आपल्या हिंदू नववर्ष दिवसाचे औचित्य साधत ‘शेलार मामा फाउंडेशन’ आयोजित ‘चिरायू सोहळा’ दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा झाला. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) साहेब आणि मनोरंजन क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी हजेरी लावली असून त्यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात 'चिरायू सोहळा २०२५' पार पडला. या सोहळ्यात सुमित पाटील ह्यांच्या  संकल्पनेतून साकाऱण्यात आलेली 'गोधडीची गुढी' (Godhdichi Gudi) उभारली असून ही गुढी सोहळ्यात विशेष आकर्षण ठरली. मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा आणि आपल्या पंरपरा ह्यांचा मिलाप असलेली ही गोधडीची गुढी लक्षवेधी ठरली. सामाजिक भान आणि पर्यावरण ह्या दोन्ही गोष्टींचा विचार होता.



सुशांत शेलार यांच्यातर्फे 'शेलारमामा फाऊंडेशन' चिरायू २०२५ चा () यंदाचा पांरपारिक गुढीपाडवा (Gudi Padwa 2025) या यशस्वी उपक्रमाला प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांची मोलाची साथ लाभली. त्याचबरोबर मराठी मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, जयवंत वाडकर, मकरंद अनासपुरे, गायक अवधूत गुप्ते, अभिनेते संतोष जुवेकर, अरुण कदम, कौस्तुभ दिवाण, अभिनेत्री मनीषा केळकर, पल्लवी वैद्य, धनश्री कांडगावकर, मीरा जोशी, परी तेलंग, दिशा परदेशी, प्राची पिसाट या आणि अशा असंख्य कलाकारांनी उपस्थिती लावत मराठमोळ्या हिंदूनववर्षाचे पारंपारीक पध्दतीने आणि जल्लोषात स्वागत केले. सर्व मान्यवरांचे गुढीपाडवानिमित्त कडूलिंब आणि गुळ खायला देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच मोडी लिपीतील राजमुद्रा भेट म्हणून देण्यात आली.


या सोहळ्यात सामाजिक भान राखून क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा पुरस्कार केला. ‘नाम फाउंडेशन’ द्वारा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी झगडणारे प्रसिद्ध अभिनेते ‘मकरंद अनासपुरे’ यांना यंदाचा ‘पर्यावरण स्नेही’ हा पुरस्कार मा. आशिष शेलार यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. शिवाय दरवर्षीप्रमाणे मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जिओ हॉटस्टारचे हेड ‘गौरव गोखले, कार रेसिंग क्षेत्रात भारताचे प्रतिनिधित्व करणारी लोकप्रिय अभिनेत्री मनीषा केळकर’, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून गणल्या जाणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रात यशस्वी २५ वर्ष पूर्ण करणाऱ्या ‘गणेश आचवल’ आणि पडद्यामागील कलावंत विभागात केशभूषेसाठी अमिता कदम, आर्ट स्पॉट करीता मारुती मगदूम, स्पॉट दादा दशरथ सावंत आदी कलाकार-तंत्रज्ञांना ‘चिरायू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


सामाजिक भान राखत, पडद्याआड वावरणाऱ्या लोंकाचा सन्मान करत,पांरपारीक गोष्टींना महत्त्व देत नवीन वर्षाच्या सुरुवात करणारा हा सोहळा खरच आगळावेगळा होता. (Gudi Padwa 2025)

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही