Chat Gpt Down Due To Ghibli : सोशल मीडियावर 'घिबली'चे तुफान; अतिवापरामुळे चॅटजीपीटी डाउन!

मुंबई : सध्या सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर 'घिबली (Ghibli) इमेज'चा ट्रेंड सुरु झाला आहे. अनेकजण ओपन एआयच्या चॅटजीपीटी (Chat Gpt) आणि एक्स वरील ग्रोक प्लॅटफॉर्मच्या मदतीने घिबली स्टाईल फोटो (Ghibli Style image) बनवून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. राजकारण्यासह अनेक अभिनेते देखील या ट्रेंडमध्ये सहभागी होत फोटो शेअर केले जात आहेत. मात्र आता घिबली इमेज चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (Chat Gpt Down)



ओपनएआयच्या चॅटजीपीटीमध्ये जागतिक स्तरावर आउटेज (Chat Gpt Down) येत आहे, ज्यामुळे स्टुडिओ घिबली फोटो तयार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वापरकर्त्यांनाही अडथळा येत आहे. त्यांच्या अ‍ॅप आणि एपीआय सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळल्या आहेत. ओपनएआयच्या चॅटजीपीटीच्या अपडेटमुळे स्टुडिओ घिबली फोटोमध्ये तुफान वाढ झाली आहे, त्यामुळे चॅटजीपीटी सेवा ठप्प झाली असल्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे.


ओपन एआयने (Open AI) अधिकृतपणे ही समस्या मान्य केली असून "आम्हाला सध्या समस्या येत आहेत", तसेच "आम्हाला असे आढळून आले आहे की प्रभावित सेवांमध्ये वापरकर्त्यांना अडथळे येत आहेत. अडथळ्याचं लवलरच निराकरण केलं जाईल' असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, चॅट जीपीटी डाऊन झाल्यामुळे अनेक ५९ टक्के वापरकर्त्यांनी चॅटजीपीटीशी संबंधित तक्रारी केल्या आहेत.



काय आहे घिबली? 


चॅटजीपीटीमध्ये स्टुडिओ घिबली-शैलीतील (Ghibli) प्रतिमा निर्मितीच्या परिचयाने जगभरातील वापरकर्त्यांना मोहित केले आहे. ज्यामुळे त्यांना सामान्य फोटोंचे रूपांतर प्रतिष्ठित जपानी अ‍ॅनिमेशन स्टुडिओपासून प्रेरित होऊन मोहक दृश्यांमध्ये करता आले आहे.



कसे वापराल हे फिचर?


चॅटजीपीटीवर यूजर त्यांचा आवडता फोटो अपलोड करून कनव्हर्ट दिस इमेज इन टू घिबली असे लिहिताच काही क्षणांतच घिबली शैलीतील छायाचित्रे मिळवता येतात. ‘एआय’द्वारे त्याचे रूपांतर जपानी ॲनिमेशनच्या क्लासिक घटकांत रूपांतरित केले जाते. त्यामुळे आठवणी या कलाकृतीचे रूप घेतात. हा ट्रेंड केवळ ओपन-एआयपुरता मर्यादित नाही, तर ग्रोक आणि जेमिनी या एआय प्लॅटफॉर्मनीही ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Comments
Add Comment

Day Care Center Viral Video : डेकेअर सेंटरमध्ये चिमुकल्यांवरील अत्याचाराचा आरोप; व्हायरल व्हिडिओनंतर ५ जणांवर गुन्हा दाखल

बंगळुरूमधील धक्कादायक घटना, डेकेअर सेंटरमध्ये चिमुकल्यांना बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल  बंगळुरू :

Indian Warships in Thailand : थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

Hindu religion : धर्मांतरित हिंदूंच्या मनात जर खरी श्रद्धा असेल, तर त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा आणि पूजा करण्याचा अधिकार

नवी दिल्ली : जर एखादी व्यक्ती जन्माने हिंदू (Hindu) नसतानाही तिला मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो का? याबाबत ती

थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.