साई मंदिरात व्ही.आय.पी भाविकांना पहाटे ४ ते ६ दर्शन द्यावे

  47

डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडली भूमिका


शिर्डी : करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या दर्शनासाठी सर्वसामान्य भाविकांना व्हीव्हीआयपी च्या दर्शनामुळे वेठीस राहावा लागत असल्याने व्हीव्हीआयपी भाविकांची वेळ तिरुपतीच्या बालाजी देवस्थानच्या धर्तीवर करण्यात करण्यात यावी आणि ती आम्ही अंमलात आणायचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन माजी खा. डॉ सुजय विखे यांनी शिर्डीत प्रसार माध्यमांशी बोलतांना केले.



दरम्यान देशातील तिरुपती नंतर नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबा मंदिरातील व्हीव्हीआयपी भाविकांच्या दर्शन वेळेत बदल कारण्यासंदर्भात माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हटले की, साई मंदिराचा दर्शन कालावधी ठरलेला आहे, तोपर्यंत सर्वसाधारण भाविक दर्शन घेत राहील. मात्र जे व्ही. व्ही.आय.पी पासद्वारे पैसे देऊन दर्शन घेतात. त्यांच्या दर्शन वेळेत बदल कलेला पाहिजे. ज्याप्रमाणे तिरुपतीला कधीही व्हीआयपी पास काढला तर त्याला दर्शनाची वेळ ही पहाटे चार ते सकाळी सहा वाजेपर्यंत ठरलेली असून याठिकाणी दिवसभरात कधीही दर्शनाचा पास मिळत नाही.त्या पार्श्वभूमीवर आम्ही साईबाबा संस्थानकडे मागणी केली आहे की, तिरुपतीच्या धर्तीवर त्याचा अभ्यास करून तेथील व्ही.आय.पी भाविकांची पहाटेची दर्शन व्यवस्था कशी अमलात आणता येईल, यासंदर्भात प्रयत्न करावा.


या मागणीमुळे सर्वसामान्य भाविकांचा दर्शनाचा अधिकार कुणीही काढून घेत नसून सर्वसामान्य साईभक्तांचे दर्शन सुरूच राहणार आहे.त्यांच्या दर्शन रांगेत कुठेच व्यत्यय होणार नाही. माझा प्रश्न व्ही.आय.पी दर्शन संदर्भात आहे. जे व्ही.आय.पी आल्याने ज्या रांगा थांबविल्या जातात. सामान्य भाविकाला वेठीस धरले जाते, हा प्रकार होणार नाही. त्यामुळे व्ही.आय.पी भाविकांची वेळ वेगळी ठेवा आणि सर्वसामान्य भाविकांची दर्शन हे पाहिल्या सारखेच सुरु ठेवा आणि व्ही.आय.पी निश्चित करा. जेणेकरून सर्वसामान्य भाविकांना दर्शनाची अडचण होणार नाही, ही माझी प्रामाणिक भावना असून ती अंमलात आणायचा प्रयत्न करणार असल्याचे माजी खा. डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

साई मंदिरात करोडोंच्या श्रद्धेवर दरोडा !

शिर्डी :  जगभरातील कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात चोरट्यांचा

साईबाबांच्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला ९ जुलै पासून प्रारंभ

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था ( शिर्डी )च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी बुधवार दि.०९ जुलै

पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट! कोकण, मराठवाड्यातही वादळी पावसाचा अंदाज; IMD ने माहिती दिली

महाराष्ट्र : दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला असून,

मुख्याध्यापक लंके यांच्या बदलीविरोधात आंदोलन, शाळेला कुलुप लावण्याचा पालकांचा इशारा

नगर (प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांची

बीड विनयभंग प्रकरण: आरोपी विजय पवारवर आणखी गंभीर आरोप; एसआयटी चौकशीचे आदेश

बीड : बीड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १६ जुलैला होणार सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू