India Help Myanmar : भूकंपाचा धक्का बसलेल्या म्यानमार आणि थायलंडच्या मदतीसाठी सरसावला भारत

नवी दिल्ली : भूकंपाचा धक्का बसलेल्या म्यानमार आणि थायलंडच्या मदतीसाठी भारत सरसावला आहे. म्यानमारमध्ये भूकंपामुळे एक हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले असून २३७६ पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. थायलंडमध्ये भूकंपामुळे १० मृत्यू झाले असून ६८ जण जखमी झाले आहेत. चीनमध्ये भूकंपामुळे दोन जण जखमी झाले आहेत. भारताने ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत भूकंप पीडितांसाठी मदतकार्य सुरू केले आहे.





भारत सरकारने म्यानमार आणि थायलंडमधील आपल्या दूतावासात हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून दोन्ही देशांतील भूकंप पीडित भारतीयांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितरित्या मायदेशी आणण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच भारत सरकारने म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंप पीडितांसाठी मदतकार्य सुरू केले आहे.





भूकंपाचा सर्वाधिक फटका म्यानमारला बसला आहे. यामुळे भारत सरकारने तातडीने तंबू, अंथरुण - पांघरुण, स्लीपिग बॅग, अन्नाची पाकिटे, पाण्याची पाकिटे, वैयक्तिक स्वच्छतेसाठीची पाकिटे, जनरेटर, औषधे, वैद्यकीय साहित्य अशी विविध प्रकारची १५ टन मदत विशेष मालवाहक विमानाने म्यानमारला पाठवली आहे.



भारतीय हवाई दलाच्या हिंडन तळावरुन सी १३० जे या मालवाहक विमानातून १५ टन मदत विशेष मालवाहक विमानाने म्यानमारला रवाना झाली. ही मदत म्यानमारमध्ये पोहोचली आहे. या व्यतिरिक्त भारतीय नौदलाच्या जहाजांमधून ४० टन मदत म्यानमारला पाठवण्यात आली आहे.
Comments
Add Comment

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात