मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा सिकंदर नावाचा हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. हा २०० कोटी रुपये खर्चून केलेला चित्रपट चालावा यासाठी सलमानची धडपड सुरू आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अर्थात जाहिरातबाजीसाठी सलमानने जेकब अँड कंपनीने तयार केलेले राम जन्मभूमी येथील राम मंदिराचे आणि हनुमान गढीच्या बजरंग बलीचे चित्र असलेले मनगटी घड्याळ वापरुन फोटोशूट केले. या फोटोशूटवरुन वाद सुरू झाला आहे.
सलमान खानने राम जन्मभूमी येथील राम मंदिराचे चित्र असलेले घड्याळ वापरल्यामुळे धर्मगुरु आणि कट्टर मुसलमान भडकले आहेत. अखिल भारतीय मुस्लिम जमातचे अध्यक्ष आणि बरेलीतल्या मुसलमानांचे धर्मगुरु मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी सलमानच्या कृतीचा निषेध केला. सलमान खानने राम मंदिराचे चित्र असलेले घड्याळ घालून इस्लाममध्ये निषिद्ध असलेली कृती केल्याचे रझवी म्हणाले. जर मुसलमानांना स्वाभिमान असेल आणि ते मुसलमान असतील तर त्यांनी सलमानचा चित्रपट बघू नये; असे आवाहन कट्टर मुसलमान अशी ओळख मिरवणाऱ्या मिर्झा बेगने केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेकब अँड कंपनीने राम मंदिराचे चित्र असलेली फक्त ४९ घड्याळं तयार केली. यातील एक घड्याळ सलमानला त्याची आई सुशीला चरक म्हणजेच सलमा खान यांनी भेट म्हणून दिले आहे. राम मंदिराचे चित्र असलेले एक घड्याळ अभिषेक बच्चन पण वापरत आहे.
जेकब अँड कंपनीविषयी थोडक्यात माहिती
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राम मंदिराचे चित्र असलेली ४९ घड्याळं तयार करणारी जेकब अँड कंपनी जेकब अराबो नावाच्या बुखारियन ज्यू व्यक्तीची आहे. इस्रायलला पाठिंबा देत असल्यामुळे अधूनमधून त्याच्यावर कट्टर मुसलमान टीका करत असतात.
सिकंदर चित्रपटाची कथा
सिकंदर हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. मुरुगदास दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला निर्मित असलेल्या या चित्रपटात भरपूर अॅक्शन आणि ड्रामा आहे. मुरुगदाससोबत सलमानचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे आणि चाहत्यांना चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…