


कणकवली : हिंदुत्वाच्या मुद्दयावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सातत्याने टीका करत आहेत. पण भगव्याचा द्वेष करणाऱ्या आणि हिरव्याचे लांगुल चालन ...
सलमान खानने राम जन्मभूमी येथील राम मंदिराचे चित्र असलेले घड्याळ वापरल्यामुळे धर्मगुरु आणि कट्टर मुसलमान भडकले आहेत. अखिल भारतीय मुस्लिम जमातचे अध्यक्ष आणि बरेलीतल्या मुसलमानांचे धर्मगुरु मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी सलमानच्या कृतीचा निषेध केला. सलमान खानने राम मंदिराचे चित्र असलेले घड्याळ घालून इस्लाममध्ये निषिद्ध असलेली कृती केल्याचे रझवी म्हणाले. जर मुसलमानांना स्वाभिमान असेल आणि ते मुसलमान असतील तर त्यांनी सलमानचा चित्रपट बघू नये; असे आवाहन कट्टर मुसलमान अशी ओळख मिरवणाऱ्या मिर्झा बेगने केले आहे.

खोपोली : मराठी नववर्ष गुढी पाडवा तोंडावर येऊन ठेपले आहे. नव वर्ष संवत्सर फल काय मिळणार, हे नुतन पंचांगात नमुद केले आहेच महाराष्ट्रात गुढी उभारून या ...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेकब अँड कंपनीने राम मंदिराचे चित्र असलेली फक्त ४९ घड्याळं तयार केली. यातील एक घड्याळ सलमानला त्याची आई सुशीला चरक म्हणजेच सलमा खान यांनी भेट म्हणून दिले आहे. राम मंदिराचे चित्र असलेले एक घड्याळ अभिषेक बच्चन पण वापरत आहे.

मुंबई (मानसी खांबे) : गुढीपाडव्याची चाहूल लागली की, गिरणगावातील कौलारू चाळींमध्ये वाजंत्रींच्या सरावाचा नाद निनादू लागतो. दोन - तीन मजली चाळींची जागा ...
जेकब अँड कंपनीविषयी थोडक्यात माहिती
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राम मंदिराचे चित्र असलेली ४९ घड्याळं तयार करणारी जेकब अँड कंपनी जेकब अराबो नावाच्या बुखारियन ज्यू व्यक्तीची आहे. इस्रायलला पाठिंबा देत असल्यामुळे अधूनमधून त्याच्यावर कट्टर मुसलमान टीका करत असतात.

मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी आणि विशेषतः उन्हाळी हंगामात वाढती गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने विविध ठिकाणी भाड्याने तीन विशेष गाड्या चालवण्याचा ...
सिकंदर चित्रपटाची कथा
सिकंदर हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. मुरुगदास दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला निर्मित असलेल्या या चित्रपटात भरपूर अॅक्शन आणि ड्रामा आहे. मुरुगदाससोबत सलमानचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे आणि चाहत्यांना चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या ...