Friday, April 18, 2025
Homeताज्या घडामोडीWestern Railway : पश्चिम रेल्वे तीन मार्गांवर उन्हाळी विशेष गाड्या चालवणार

Western Railway : पश्चिम रेल्वे तीन मार्गांवर उन्हाळी विशेष गाड्या चालवणार

मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी आणि विशेषतः उन्हाळी हंगामात वाढती गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने विविध ठिकाणी भाड्याने तीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०९०२७/०९०२८ उधना – दानापूर साप्ताहिक विशेष (२६ फेऱ्या) क्रमांक ०९०२७ उधना – दानापूर विशेष गाडी दर गुरुवारी उधना येथून ११:२५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता दानापूरला पोहोचेल. ही गाडी ३ एप्रिल ते २६ जूनपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, गाडी क्र. ०९०२८ दानापूर – उधना विशेष गाडी दर शुक्रवारी दानापूरहून संध्याकाळी ४ :४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११ . ३० वाजता उधना येथे पोहोचेल. ही गाडी ४ एप्रिल ते २७ जून पर्यंत धावेल. ही गाडी दोन्ही दिशांना चालठाण, बारडोली, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, मदन महाल, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, बक्सर आणि आरा स्थानकांवर थांबेल. या गाडीमध्ये स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच असतील.

Gudi Padwa 2025 : परंपरेचा ढोल निनाद…!

ट्रेन क्रमांक ०९३०९/०९३१० इंदूर-हजरत निजामुद्दीन अतिजलद विशेष (आठवड्यातून दोनदा) [५२ फेऱ्या]गाडी क्रमांक ०९३०९ इंदूर – हजरत निजामुद्दीनअतिजलद विशेष ही गाडी दर शुक्रवार आणि रविवारी इंदूरहून सायंकाळी ५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचेल. ही गाडी ४ एप्रिल ते २९ जून पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, गाडी क्र. ०९३१० हजरत निजामुद्दीन – इंदूर अतिजलद विशेष ही गाडी दर शनिवार आणि सोमवारी सकाळी ८:२० वाजता हजरत निजामुद्दीन येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ९ वाजता इंदूरला पोहोचेल. ही गाडी ०५ एप्रिल ते ३० जूनपर्यंत धावेल. ही गाडी दोन्ही दिशांना देवास, उज्जैन, नागदा, शामगढ, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, गंगापूर सिटी, भरतपूर आणि मथुरा स्थानकांवर थांबेल. या गाडीमध्ये एसी २-टायर, एसी ३-टायर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच असतील गाडी क्रमांक ०९३४३/०९३४४ डॉ. आंबेडकर नगर – पटना विशेष (साप्ताहिक) (२६ फेऱ्या)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -