Kunal Kamra : कुणाल कामराच्या अडचणीत वाढ! आणखी ३ एफआयआर दाखल

मुंबई : विनोदी कलाकार कुणाल कामराने (Kunal Kamra) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली होती. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात वादाचे चित्र निर्माण झाले होते. शिंदेसेनेचे कार्यकर्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थकांकडून कुणाल कामराच्या स्टुडीओची देखील तोडफोड करण्यात आली होती. अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल विनोदी कलाकार कुणाल कामरावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. यातच आता कामराच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे समोर आले आहे.



विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध महाराष्ट्रात आणखी तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. मनमाड, नाशिक येथील मयूर बोरसे; जळगाव जामोद, बुलढाणा येथील संजय भुजबळ; आणि नांदगाव मनमाड, नाशिक येथील सुनील जाधव या शिवसेनेच्या सदस्यांनी कामरा विरोधात तीन नवीन एफआयआर दाखल केले आहेत. 'कुणाल कामराने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नैतिक वर्तनाची बदनामी अपमानास्पद विधाने करून दोन्ही राजकीय पक्षांमध्ये द्वेष निर्माण केला' असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.


एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमांखाली नवीन एफआयआर देखील नोंदवण्यात आले आहेत, ज्यात ३५३(१)(ब), ३५३(२) (सार्वजनिक गैरवर्तन करणारे विधान) आणि ३५६(२) (बदनामी) यांचा समावेश आहे. खार पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. खार पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी दोनदा बोलावले आहे पण तो अद्याप हजर झालेला नाही. यानंतर, त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी ३१ मार्च रोजी समन्स बजावले आहे.



वक्तव्याबद्दल माफी मागणार नाही - कुणाल कामरा


कुणाल कामरा याने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, ते त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागणार नाहीत. नंतर, त्याने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सरकार आणि मंत्र्यांवर टीका करणारे आणखी व्हिडिओ देखील शेअर केले.

Comments
Add Comment

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या