मुंबई : सांताक्रूझ येथील ३२ वर्षीय महिलेला जादूटोण्याचा प्रभाव दूर करण्याच्या बहाण्याने एका तांत्रिकाने (Bhondu Baba) ३.४७ लाख रुपयांना गंडा घातला. पीडित महिलेची ओळख या तांत्रिकाशी इन्स्टाग्रामद्वारे झाली होती. तिच्या प्रियकरावर दुसऱ्या मुलीने ‘करणी’ केली असल्याचे सांगत तांत्रिकाने विविध विधींसाठी या महिलेकडून पैसे उकळले. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पीडित महिलेची २०२४च्या ऑक्टोबरमध्ये एका युवकाशी ओळख झाली होती. हा युवक मूळचा उत्तर प्रदेशचा असून ठाण्यात राहतो. तक्रारदार महिलेच्या मते, या ओळखीचे पुढे प्रेमात रुपातर झाले. पुढे जेव्हा जेव्हा ती आपल्या प्रियकराला भेटायची, तेव्हा तो तिच्यासमोर फोन कॉल्स टाळायचा, त्यामुळे तिला त्याच्यावर अफेअर असल्याचा संशय आला.
याच संशयाच्या भूताने पछाडलेल्या या महिलेने, जानेवारी २०२५ मध्ये एका ज्योतिषीचा इन्स्टाग्रामवरील स्टोरी पाहिली. तो फक्त २५१ रुपये शुल्क घेऊन वैयक्तिक जीवन, नातेसंबंध आणि करिअरविषयी अचूक माहिती देतो, असा दावा करत होता.
महिलेने आपल्या प्रियकराची माहिती त्या ज्योतिषी-कम-तांत्रिकाला दिली. त्याने सांगितले की, तिच्या प्रियकरावर काळ्या जादूचा प्रभाव आहे आणि तो दूर करण्यासाठी काही विशिष्ट विधी करावे लागतील. हळूहळू तांत्रिकाने वेगवेगळ्या विधींसाठी एकूण ५३ व्यवहारांमध्ये तिच्याकडून ३.४७ लाख रुपये घेतले.
तांत्रिकाने पुढे राजस्थानला येऊन होम-हवन आदी मोठ्या पूजेसाठी बोलावले, मात्र महिलेने जाण्यास नकार दिला. त्यानंतर तांत्रिकाने मुंबईत येण्याचे आश्वासन दिले, पण अनेक दिवस झाले तरी तो आला नाही. तसेच तिच्या प्रियकराच्या वागण्यात काहीही फरक पडत नसल्याने अखेर तिला फसवणुकीचा संशय आला. तिने वाकोला पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
वाकोला पोलिसांनी भा.द.वि.सं. आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांखाली तांत्रिकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला हरवले…
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…
मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…