April Bank Holidays : एप्रिल महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी जाहीर! वेळापत्रक पाहूनच करा सर्व काम

  132

मुंबई : एप्रिल महिना आणि आर्थिक नव वर्षाला सुरुवात होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. दरम्यान नवा महिना सुरु होण्याआधी दोन दिवसापूर्वीच आरबीआयकडून (RBI) बँक सुट्ट्यांची यादीजाहीर करण्यात येते. त्यानुसार एप्रिल महिन्यातील बॅमक सुट्ट्यांची यादी देखील आरबीआयने जाहीर (April Bank Holidays) केली आहे. या महिन्यात १२ दिवस बँका बंद असणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी वेळापत्रक पाहूनच बँकेची कामे हाती घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.



पाहा बँक सुट्ट्यांच्या यादी



  • १ एप्रिल २०२५ मंगळवार या दिवशी व्यावसायिक बँकांच्या वार्षिक इन्व्हेंटरीमुळे या दिवशी बँका बंद राहतील.

  • ६ एप्रिल २०२५ रविवार असून रामनवमी देखील आहे.

  • १० एप्रिल २०२५ गुरुवार रोजी जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त या दिवशी देशभरातील बँका बंद राहतील.

  • १२ एप्रिल २०२५ शनिवारी महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.

  • १३ एप्रिल २०२५ रविवार या दिवशी देशभरातील बँका बंद राहतील.

  • १४ एप्रिल २०२५ सोमवार संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरातील बँका बंद राहतील.

  • १५ एप्रिल २०२५ मंगळवार यावेळी बोहाग बिहूमुळे कोलकाता, आगरतळा, शिमला, गुवाहाटी आणि इटानगरमधील बँका बंद राहतील.

  • १६ एप्रिल २०२५ बुधवार दिवशी बोहाग बिहूमुळे गुवाहाटीमध्ये या दिवशी बँकांना सुट्टी.

  • १८ एप्रिल २०२५ शुक्रवारी गुड फ्रायडे मुळे देशभरातील बँका बंद राहतील.

  • २१ एप्रिल २०२५ सोमवारी गरिया पूजेमुळे फक्त आगरतळामधील बँका बंद राहतील.

  • २६ एप्रिल २०२५ शनिवार हा दिवस महिन्याचा चौथा शनिवार आहे, त्यामुळे देशभरातील बँका बंद राहतील.

  • २९ एप्रिल २०२५ मंगळवार हा दिवस भगवान श्री परशुराम जयंती आहे. त्यामुळे या दिवशी बँकांना सुट्टी असेल.

  • ३० एप्रिल २०२५ बुधवारी बसव जयंती आणि अक्षय्य तृतीयेमुळे बेंगळुरूमध्ये बँका बंद राहतील. (April Bank Holidays)

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या