मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टिंगल करणारी कविता केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई होऊ नये, पोलिसांनी अटक करू नये यासाठी स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामराची धावपळ सुरू आहे. त्याने महाराष्ट्रातल्या प्रकरणासाठी चेन्नई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.
Bank Holiday : बँकेची ईदची सुट्टी रद्द; ३१ नव्हे ‘या’ तारखेला राहणार बँका बंद!
मुंबई पोलिसांनी कुणाल कामरा प्रकरणी शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीआधारे झिरो एफआयआर नोंदवून घेतली आहे. नंतर एफआयआर तपासाकरिता खार पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. एफआयआर भारत न्याय संहिता कलम ३५३ (१) (ब), ३५३ (२) (सार्वजनिक उपद्रव) आणि ३५६ (२) अंतर्गत नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणात अटकेचे संकट लक्षात येताच स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामराने चेन्नई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. तामीळनाडूतील विलुप्पुरमचा रहिवासी असल्याचे कारण देत कामराने चेन्नई उच्च न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केला.
Chhatrapati Sambhajinagar News : दत्तक घेतलेल्या ४ वर्षीय चिमुरडीला आई वडिलांनी संपवलं!
याआधी मुंबई पोलिसांनी कामराला मंगळवार २५ मार्च पर्यंत पोलीस ठाण्यात हजर होण्यासाठी नोटीस बजावली होती. पण कामराने वेळ मागितला. यानंतर पोलिसांनी कामराला सोमवार ३१ मार्चपर्यंत हजर होण्यासाठी दुसरी नोटीस बजावली. तर कुणाल कामराने अटक टाळण्यासाठी चेन्नई उच्च न्यायालयात धाव घेतली.