मुंबई : नवीन महिन्याला सुरुवात होताच आरबीआयकडून (RBI) बँकींग सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते. त्यानुसार ३१ मार्च रोजी रमजान ईद निमित्त (Eid Holiday) महाराष्ट्रात आणि भारतातील बहुतांश राज्यात सुट्टी देण्यात आली होती मात्र आता आरबीआयने नवीन निर्देश जारी करत त्या दिवशी सुट्टी (Bank Holiday) रद्द केली आहे. त्यामुळे आता रमजानच्या दिवशी सर्व बँकिंग सेवा सुरु राहणार आहेत. जाणून घ्या यामागचं नेमकं कारण काय.
ऑक्सफर्ड विद्यापीठात ममता बॅनर्जींच्या भाषणावेळी ‘परत जा’ अशी घोषणाबाजी
येत्या १ एप्रिल २०२५ पासून नवं आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यवसाय संस्थेत बदल होत राहतात. आरबीआयकडून (RBI) देखील नवं वर्षात देशभरातील सर्व बँकिगच्या नियमावलीत बदल केले जातात. दरम्यान, ३१ मार्च आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षांशी निगडीत सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांना कामावर यावे लागणार आहे. दरम्यान, आज आणि उद्या जम्मू काश्मीरमधील बँका बंद राहणार आहेत. २९ मार्च शनिवारी बँका बंद असतील अस अनेकांना वाटत आहे. मात्र, २९ तारखेला पाचवा शनिवार असल्याने बँका खुल्या राहणार आहेत.
त्याचबरोबर. रिझर्व्ह बँकेने (RBI) सुरूवातीच्या काळात ३१ मार्चला बँक हॉलिडे जाहिर केला होता, परंतु २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने आणि वर्षातील आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याची अंतिम तारीख असल्याने ही सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ही सुट्टी १ एप्रिल रोजी बँकांना सुट्टी देण्यात येणार आहे.
बँक सुट्ट्यांच्या दिवशी कोणत्या बँकिंग सेवा राहणार सुरु?
बँक सुट्ट्यांच्या (Bank Holiday) दिवशी ग्राहक वर्षभरासाठी डिजिटल किंवा नेट बँकिंग सेवा वापरू शकतात. तसेच सर्व बँक वेबसाइट्स, बँकिंग अॅप्स, UPI आणि ATM सेवा वर्षभर सक्रिय राहतील. या दिवशी तुम्ही डिजिटल पद्धतीने फिक्स्ड डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिट देखील सुरू करू शकता.