मुंबई : दिड महिन्यांपूर्वी विकी कौशलचा (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या आधारित ‘छावा’ (Chhaava Movie) चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. विकी कौशलच्या ‘छावा’ ने अद्भुत कामगिरी केली आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये सुरू होऊन जवळजवळ दीड महिना झाला आहे आणि अजूनही चित्रपट पाहण्यासाठी सिनेप्रेमींची मोठी रांग लागली आहे. दरम्यान या चित्रपटाने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची कमाई केली असून अनेक मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांचे रेकॉर्डही मोडले आहेत. आता लवकरच या चित्रपटाचा गल्ला तब्बल ६०० कोटींपर्यंत भरणार असल्याची माहिती मिळत आहे. (Chhaava Box Office Collection)
चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २१९.२५ कोटी, दुसऱ्या आठवड्यात १८०.२५ कोटी, तिसऱ्या आठवड्यात ८४.०५ कोटी, चौथ्या आठवड्यात ५५.९५ कोटी आणि पाचव्या आठवड्यात ३३.३५ कोटी रुपये कमावले. चित्रपटाने ३६व्या दिवशी २.१ कोटी रुपये, ३७ व्या दिवशी ३.६५ कोटी रुपये, ३८ व्या दिवशी ४.६५ कोटी रुपये, ३९ व्या दिवशी १.६ कोटी रुपये, ४० व्या दिवशी १.५ कोटी रुपये आणि ४१ व्या दिवशी १.४ कोटी रुपये कमावले. आता चित्रपटाच्या ४२ व्या दिवशीच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
दरम्यान, ‘छावा’ सध्या ६०० कोटींचा टप्पा ओलांडण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. मात्र याचवेळी सलमान खानचा सिकंदर येत्या ३० मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सलमान खानचा (Salman Khan) मोठा चाहता वर्ग आणि सिकंदरची लोकप्रियता पाहता त्याला बंपर ओपनिंग मिळण्याची शक्यता वर्तण्यात येत आहे. त्यामुळे सिकंदरच्या (Sikandar) प्रदर्शनाचा ‘छावा’वर काही फरक पडणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…