IPL 2025 : आयपीएलमध्ये पहिल्यांदाच 'सेकंड बॉल' नियमाचा वापर!

नवीन नियम वापरुनही राजस्थान रॉयल्सचा पराभव


मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात २६ मार्च रोजी गुवाहाटी येथे सामना झाला. या आयपीएल २०२५ सामन्यात पहिल्यांदाच एका डावात 'सेकंड बॉल'चा नियम वापरण्यात आला. केकेआरच्या डावाच्या १७ व्या षटकात राजस्थान रॉयल्सने प्रभारी कर्णधार रियान परागच्या नेतृत्वाखाली चेंडू बदलण्याची विनंती केली, पण तो सामन्याचा रंग बदलण्यासाठी पुरेसा नव्हता. नवीन नियम वापरुनही, राजस्थान रॉयल्सचा केकेआरकडून आठ विकेट्सनी पराभव झाला. हा त्याचा सलग दुसरा पराभव होता. क्विंटन डी कॉकच्या ६१ चेंडूत ९७ धावांच्या शानदार खेळीमुळे कोलकाताने हंगामातील पहिला विजय नोंदवला.



सांयकाळी खेळल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये, जर पंचांना वाटत असेल की दव पडल्याने खेळावर परिणाम होत असेल तर ते दुसऱ्या डावाच्या ११ व्या षटकातून नवीन चेंडू वापरण्याची परवानगी देऊ शकतात. हा नियम फक्त संध्याकाळी होणाऱ्या सामन्यांना लागू असेल. दुपारी होणाऱ्या सामन्यांना हा नियम लागू होणार नाही. यामुळे उच्च-स्कोअरिंग सामने राखण्यास मदत होईल. जेणेकरून दोन्ही डावात खेळ संतुलित राहील आणि पाठलाग करणाऱ्या संघाला दव पडण्याची मदत मिळणार नाही. अनेकदा संध्याकाळच्या सामन्यांमध्ये, दवामुळे, नाणेफेक जिंकणारे संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतात. यामुळे आता खेळ संतुलित होईल.

Comments
Add Comment

न्यूझीलंडविरुद्ध वनडेतून ३ स्टार खेळाडूंचा पत्ता कट ? दिग्गजांचं कमबॅक ?

मुंबई : जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक

नवी दिल्ली : गौतम गंभीर भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम राहील. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट

भारतीय महिला हॉकीला सापडला नवा ‘हिरा’

प्रशिक्षिका हेलिना मेरीकडून बन्सुरी सोलंकीचे कौतुक नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकीच्या भविष्यातील सुरक्षित

श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय

तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या

स्मृती मानधनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी झेप

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा