मुंबई : साऊथचा सुपरस्टार राम चरणने (Ram Charan) आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. आजवर राम चरणने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आज अभिनेत्याचा ४०वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्याने चाहत्यांना मोठे गिफ्ट दिल आहे. राम चरण आणि जान्हवी कपूर यांच्या बहुप्रतिक्षित ‘आरसी १६’ चित्रपटाचा पहिला लूक गुरुवारी निर्मात्यांनी प्रदर्शित केला. राम चरणच्या या चित्रपटाचे नाव ‘पेडी’ असे ठेवण्यात आले आहे. समोर आलेल्या पोस्टरमध्ये राम चरणच्या तोंडात बिडी असून नजरेत अंगार पाहायला मिळत आहे. या पोस्टरने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. अभिनेत्रीच्या वाढदिवशी या चित्रपटाचे पोस्टर निर्मात्यांनी शेअर केले आहे.
आज अभिनेता राम चरण त्यांचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. या प्रसंगी, निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षक आणि अभिनेत्याचा पहिला लूक त्याच्या चाहत्यांना भेट म्हणून प्रदर्शित केला. यावेळी राम चरणचा लूक खूपच वेगळा आणि आकर्षित दिसत आहे. या पोस्टरमध्ये राम चरणचे तीक्ष्ण डोळे, विस्कटलेले केस, विस्कटलेली दाढी आणि नाकामधील बाली त्याला एका तीव्र अवतारात दाखवत आहेत. दुसऱ्या पोस्टरमध्ये तो एक जुनी क्रिकेट बॅट धरलेला दिसून येत आहे. तसेच पोस्टरमध्ये एक गावातील स्टेडियम आहे जे फ्लडलाइट्सने प्रकाशित झाले आहे. हे चित्र एका ग्रामीण आणि मनोरंजक चित्रपटाचे संकेत देत आहे.
राम चरणचा ‘पेड्डी’ हा चित्रपट मोठ्या बजेट आणि मोठ्या स्टारकास्टसह बनवण्यात आला आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर, शिवा राजकुमार, जगपती बाबू आणि दिव्येंदु शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हे बुची बाबू सना यांनी लिहिले आणि दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. एक खास गोष्ट म्हणजे यात कन्नड मेगास्टार शिवा राजकुमार एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांनी संगीताची धुरा हाती घेतली आहे.
राम चरणच्या या चित्रपटाचे हैदराबाद शेड्यूल नुकतेच पूर्ण झाले आहे. शूटिंग पूर्ण होताच त्याचा पहिला लूक शेअर करण्यात आला. तथापि, त्याचे इतर ठिकाणी चित्रीकरण होणे बाकी आहे. पहिल्या लूकनंतर, चाहते आता त्याच्या ट्रेलरची आणि रिलीज तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…