Tiger vs Pathan : सलमान खानच्या ‘टायगर वर्सेस पठाण’ला ब्रेक – नव्या सिनेमांसाठी केले मोठे खुलासे!

Share

मुंबई : सलमान खानच्या (Salman Khan) बिग बजेट सिनेमाला ब्रेक लागला असून, ‘टायगर वर्सेस पठाण’ (Tiger vs Pathan) हा मेगा प्रोजेक्ट सध्या कोणत्याही स्थितीत बनत नाही आहे, (Salman Khan Movie Tiger vs Pathan Postponed) अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या ‘सिकंदर’ चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सलमान खानने त्याच्या आगामी सिनेमांविषयी महत्त्वाचे खुलासे केले.

शाहरुख खानच्या ‘जवान’ ला ब्लॉकबस्टर हिट देणाऱ्या दिग्दर्शक अॅटलीसोबत सलमान एका बिग बजेट चित्रपटासाठी काम करणार होता. मात्र, फंडिंगच्या अडचणीमुळे हा प्रोजेक्ट तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. सलमानने स्पष्ट केले की, “आम्ही हा प्रोजेक्ट करण्यासाठी प्रयत्न केले, पण काही गोष्टी जुळून आल्या नाहीत.”

तसेच, अॅटली सलमान आणि रजनीकांत यांना एकत्र आणण्याच्या तयारीत होता, पण वाढलेल्या बजेटमुळे निर्मात्यांनी हा सिनेमा पुढे ढकलला आहे.

याशिवाय, सलमानने संजू बाबासोबतच्या (संजय दत्त) नव्या चित्रपटाविषयी सांगितले की, हा चित्रपट पूर्णपणे देहाती शैलीतील आणि नेक्स्ट लेव्हल असणार आहे. मात्र, त्याने अधिक तपशील उघड केले नाहीत.

‘अंदाज अपना अपना 2’ बद्दलही मोठा खुलासा करताना सलमान म्हणाला, “हो, मी आणि आमिर दोघेही खूप उत्साहित आहोत. दिग्दर्शक राजकुमार संतोषी काहीतरी भन्नाट घेऊन येणार आहेत.”

‘बजरंगी भाईजान’ च्या सिक्वेलबद्दल विचारले असता, “हो, हा प्रोजेक्ट होऊ शकतो. कबीर खान यावर काम करत आहे,” असे तो म्हणाला.

सलमान खानने सूरज बडजात्या यांच्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याचीही घोषणा केली. चित्रपटाचे नाव जाहीर झाले नसले तरी लवकरच शूटिंगला सुरुवात होणार आहे.

या घोषणांमुळे सलमानच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, आता त्याचा पुढील चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती मोठा धमाका करतो, हे पाहणे उत्साहवर्धक ठरेल.

Recent Posts

मंदिर पाडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…

27 minutes ago

ईडीची टांगती तलवार…

स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…

33 minutes ago

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी सुवर्णसंधी; एसएसबी कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण

मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…

2 hours ago

साईबाबांच्या चरणी ६८ लाखांचा सुवर्ण मुकुट; श्रद्धेची भक्तिपूर्ण देणगी

दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…

2 hours ago

Star Pravah vs Sony Marathi : स्टार प्रवाह आणि सोनी मराठीमध्ये टक्कर!

'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…

4 hours ago

Nails : नखे ठरवतात तुम्ही किती वर्ष जगणार; जाणून घ्या कसं?

मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…

4 hours ago