Santosh Deshmukh Murder Case : अखेर पापाचा घडा भरला! संतोष देशमुख हत्येप्रकरणातील आरोपींची हत्येची कबुली

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नवीन अपडेट समोर आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी मुख्य तीन आरोपींनी हत्येची कबुली दिली असल्याची माहिती मिळाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसह आठ आरोपी आहेत. यातील कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. याबाबत केज न्यायालयात सुनावणी झाली. परंतु, सुरक्षेचे कारण देत सीआयडीने हे प्रकरण बीड न्यायालयात चालवावे, अशी विनंती केली होती. त्याप्रमाणे बुधवारी पहिली सुनावणी बीड न्यायालयात पार पडली. यावेळी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी ३२ मिनिटांत खंडणी ते हत्या हा घटनाक्रम मांडला. तसेच सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर, टॉवर लोकेशन, ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग असे पुरावे असल्याचे सांगितले. हेच पुरावे आम्हाला देण्यात यावेत, अशी विनंती आरोपींच्या वकिलांनी अर्ज करून केली. आता पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे. त्याआधीच हत्येचा प्रमुख आरोपी सुदर्शन घुलेने पोलिसांसमोर कबूल केले आहे की, त्यानेच संतोष देशमुखांचे अपहरण करून हत्या केली. याशिवाय, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी देखील यासंबंधी आपली कबुली दिली असल्याची बातमी समोर आली आहे. सुदर्शन घुलेच्या कबुली नंतर वाल्मिक कराड अडचणीत येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि