Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Vashi Creek : वाशी खाडीपुलावरील तिसऱ्या पुलाचे कामही पूर्ण!

Vashi Creek : वाशी खाडीपुलावरील तिसऱ्या पुलाचे कामही पूर्ण!

नवी मुंबई : मुंबईहून वाशीकडे जाणाऱ्या पुलाचे (Vashi Creek) उद्घाटन माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विधानसभा आचारसंहितेपूर्वी १३ ऑक्टोंबरला झाले. आता मुंबईकडे जाणाऱ्या तिसऱ्या वाशी खाडीपुलावरील (Vashi Creek) पुलाचे कामही पूर्ण झाले आहे. तर मानखुर्दच्या दिशेने नवी मुंबईकडे येणाऱ्या रस्त्याचे कामही पूर्ण झाले आहे.


ठाणे खाडीवर मुंबई-पुणे, पुणे-मुंबई दोन्ही दिशेला दोन नवीन बहुचर्चित उड्डाणपूल तयार करण्यात आले आहेत. यापैकी वाशीहून मुंबईकडे जाणाऱ्या तिसऱ्या उड्डाणपुलाचे कामही (Vashi Creek) पूर्णत्वास आले आहे. या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला अधिवेशनानंतरच मुहूर्त मिळणार असल्याचे चित्र आहे. एल अँड टी कंपनीने तिसऱ्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याचे एमएसआरडीसीला कळविले. परंतु अधिवेशन सुरू असल्यामुळे आता अधिवेशनानंतरच या उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.



तसेच मानखुर्दकडून वाशीकडे येणारी वाहतूक सुरळीत व वेगवान झाली असल्याची माहिती मानखुर्द वाहतूक विभागाने दिली. अटलसेतू झाल्यानंतर सुरुवातीला वाशी उड्डाणपुलावरील ताण काहीसा कमी झाला होता. तसेच उरण, पनवेलची वाहतूक अटल सेतूवरुन जात होती. परंतु शासनाच्या टोलमाफीनंतर अटल सेतूवरुन मुंबईला दररोज जाणाऱ्या १० ते १२ हजार गाड्यांची वाहतूक पुन्हा वाशीखाडीपुल मार्गाने होत आहे. त्यामुळे वाशीवरुन टोलनाक्याजवळ मुंबईला जाताना ११ लेनची वाहतूक दुसऱ्या उड्डाणपुलाच्या तोंडाशी टोलनाक्यावर फक्त २ लेनमध्ये वर्ग होत असल्याने सकाळी व संध्याकाळी वाहनचालकांना मुंबईकडे जाताना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे नवी मार्गिका सुरू झाल्यावर या मार्गावरील वाहतूकही वेगवान होणार आहे.

Comments
Add Comment