पुणे : वेगवेगळ्या गैर प्रकाराने सदैव चर्चेत असणाऱ्या ससून रुग्णालयात उपचारासाठी असलेला विनयभंग गुन्ह्यातील आरोपी हा नेमणुकीस असलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी संतोष साठे (वय ५० वर्षे रा. म्हसोली ता. कराड) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव असून याबाबत त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik News : नाशिकमध्ये स्पीकरचा आवाज कमी करण्यास सांगितल्याने तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड
बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी ६ वाजून ४५मिनिटांनी ससून हॉस्पिटल वॉर्ड क्र. १८ येथे उपचारासाठी दाखल असलेला आरोपी संतोष साठे हा बंदोबस्तावर असलेल्या पोलिस अमलदारांची नजर चुकवून पळून गेला आहे. त्याच्यावर कराड तालुका पोलीस स्टेशन येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.या विनयभंगाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात बंदिस्त असताना त्याच्या छातीत दुखत असल्याने त्याला मंगळवारी ससून रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
त्यावेळी कराड पोलीस स्टेशनचे दोन गार्ड कर्तव्यावर हजर होते मात्र, त्यांची नजर चुकवून संबंधित आरोपी हा पसार झाला आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेची पाहणी करण्यात आली असून संबंधित आरोपीचा माग काढण्यात येत आहे याबाबत पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहे.