विरोधकांच्या डोक्यात ‘कबर आणि कामरा’; अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला

अधिवेशनानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद; सरकारच्या कामाचा दिला आढावा


मुंबई : "विरोधकांच्या डोक्यात फक्त ‘कबर आणि कामरा’ आहे, पण आमच्यासाठी महाराष्ट्रातील १३ कोटी जनता महत्त्वाची आहे," असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समारोपानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारच्या कामाचा आढावा घेतला आणि विरोधकांवर टीकास्त्र सोडले.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. माथाडी सुधारणा विधेयक आणले, शेतकरी आणि कामगारांसंदर्भात महत्त्वाच्या चर्चा केल्या. जिथे सहा तास काम अपेक्षित असते, तिथे आम्ही रोज नऊ तास सभागृह चालवले. मोठे बहुमत असूनही आम्ही कोणतीही चर्चा टाळली नाही. आमचे सरकार हे केवळ घोषणाबाजी करणारे नव्हे, तर काम करणारे आहे."



या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मात्र, अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते.







अधिवेशनातील प्रमुख निर्णय आणि कायदे


१२ महत्त्वाचे कायदे मंजूर झाले.
माथाडी कामगार कायद्यात सुधारणा – बनावट माथाडी कामगार ओळखण्यास मदत होणार.
विनियोजन विधेयक मंजूर – सरकारच्या खर्चासंदर्भात महत्त्वाचा निर्णय.
सर्व प्रश्नांना मंत्र्यांनी उत्तर दिली – फक्त एका दिवशी मंत्र्यांना सभागृहात पोहोचण्यास उशीर झाला, त्यामुळे २० मिनिटांचा वेळ वाया गेला.







धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्रींचे स्पष्टीकरण


धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले, "आम्ही ना नरम आहोत, ना गरम; आम्ही कायद्याने चालणारे आहोत. कायद्याने जे योग्य तेच केले आहे."







विरोधी पक्षनेते निवडीचा मुद्दा ‘अध्यक्षांच्या कोर्टात’


विरोधी पक्षनेता अद्याप निश्चित का झाला नाही, याबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, "हा अधिकार आमचा नाही, तो विधीमंडळ अध्यक्षांचा आहे. अध्यक्ष स्वतंत्र आहेत, ते निर्णय घेतील. त्यांनी उद्या निर्णय घेतला तरी आम्हाला हरकत नाही."







अधिवेशनात लक्षवेधी सूचना वाढल्या, पण...


अधिवेशनात लक्षवेधी सूचना मोठ्या प्रमाणावर वाढल्या, मात्र यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "यात काही हरकत नाही, पण अध्यक्ष आणि सभापतींना विनंती आहे की निकषात बसणाऱ्या लक्षवेधी सूचना घेतल्या पाहिजेत."


अधिवेशन संपले असले, तरी सरकारने घेतलेल्या निर्णयांची आणि विरोधकांच्या भूमिकेची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू राहणार आहे.

Comments
Add Comment

भिवंडीतील ट्रॅफिकवर कायमस्वरूपी तोडगा; १० एकर जागेवर विशेष व्यवस्था, मंत्री मेघा बोर्डीकर यांची घोषणा

नागपूर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा मुंबईपर्यंतचा विस्तार आणि ठाणे-भिवंडी परिसरातील

मुंबईतील गोरेगावमध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तोडले महिलांच्या गालांचे लचके

मुंबई : भटक्या कुत्र्यांच्या टोळीने महिलांच्या गालांचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना मुंबईतील गोरेगावमध्ये

काळा घोडा परिसराचे सुशोभीकरण, महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा आणि पुरातन वास्तू असलेला परिसर म्हणून काळा घोडा

विलेपार्ल्यात महायुतीचा जोर, उबाठा आणि काँग्रेसच्या उमेदवारांसमोर आव्हान

चित्र पालिकेचे विलेपार्ले विधानसभा  मुंबई (सचिन धानजी) : उत्तर मध्य मुंबईतील विलेपार्ले विधानसभा क्षेत्रात

मुंबई पागडीमुक्त करण्यासाठी स्वतंत्र नियमावली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाची घोषणा मुंबई : मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसेच पागडी

पारंपरिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ

मुंबई : भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत