ट्रेडबायनरी कंपनीत दापोलीतील तरुणांमधून आयटी तज्ज्ञ घडविणार

मुंबई : ट्रेडबायनरी या आघाडीच्‍या तंत्रज्ञान आणि कन्‍सल्टिंग कंपनीने महाराष्‍ट्रातील दापोलीमध्‍ये आयटी तज्ज्ञ तयार करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत हा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातल्या तरुणांना आयटी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच दापोली तालुक्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. दापोली मॉडेल यशस्वी झाले तर ट्रेडबायनरी कंपनी भारतातील ग्रामीण भागाला जागतिक आयटी क्षेत्रामध्‍ये पॉवरहाऊस बनवण्‍यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करणार आहे.



ट्रेडबायनरी कंपनी शहर आणि ग्रामीण भागातील गुणवंतांमधील फरक कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. हा उपक्रम आयटी विकेंद्रीकरणासाठी स्‍केलेबल मॉडेल आहे, जो भारतातील डिजिटल कर्मचारीवर्ग क्रांतीसाठी उदाहरण निर्माण करेल असा विश्वास ट्रेडबायनरीचे संस्‍थापक व संचालक असलेल्या युवराज शिधये आणि दर्शिल शाह या दोघांनी व्यक्त केला.
Comments
Add Comment

डोंबिवलीतील अनमोल म्हात्रे, महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई : डोंबिवलीतील राजकीय घडामोडींमध्ये मोठा बदल झाला आहे. माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांचे पुत्र अनमोल

बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरेच्या मुंबईतील घराला भीषण आग !

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’ आणि इतर रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांच्या मनावर घर करणाऱ्या अभिनेता शिव ठाकरेच्या मुंबईतील

महापालिकेच्या मालमत्ता विभागांमध्ये वर्षांनुवर्षे अधिकारी एकाच जागेवर, विकासकांची साठेलोटे असल्याचा बीआयटी चाळीतील भाडेकरुंचा आरोप

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागात मागील १६ वर्षांपासून अधिकारी कार्यरत असून यातील

दादर पश्चिमेची वाहतूक कोंडी सुटणार

जे. के. सावंत मार्ग जोडणारा येलवे रस्ता सेनापती बापट मार्गाला जोडणार मुंबई : एलफिन्स्टन पूल बंद करण्यात आल्याने

मुंबईत आधीपासूनच ८ ठिकाणी भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण, लसीकरण

मुलुंडमध्ये विरोध झाल्याने महापालिका अधिकारी झाले अवाक् मुंबई : महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबईत एकूण ८

भरती परीक्षेच्या निकालानंतर चार दिवसांत नियुक्तीपत्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश मुंबई (प्रतिनिधी) : शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या