मेट्रो स्थानकातून उतरून थेट कार्यालय, मॉल, कॉलेजमध्ये पोहोचता येणार

मेट्रो स्थानकांना पादचारी पुलाशी जोडण्याचा निर्णय


मुंबई (प्रतिनिधी): मेट्रो स्थानकातून उत्तरल्यानंतर थेट आपल्या इमारतीत, खरेदीसाठी मॉलमध्ये किंवा शाळा महाविद्यालयात, कार्यालयात पोहोचणे आता शक्य होईल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) 'मल्टीमॉडल इंटीग्रेशन' अंतर्गत खासगी-सार्वजनिक सहभागातून मेट्रो स्थानकांच्या आसपासची महत्त्वाची ठिकाणे थेट मेट्रो स्थानकांना पादचारी पुलाशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे.


मेट्रोच्या या प्रयत्नानुसार प्रायोगिक तत्त्वावर असा पहिला पादचारी पूल नुकताच सेवेत दाखल झाला आहे. 'दहिसर-गुंदवली मेट्रो ७' मार्गिकतील बोरिवलीतील देवीपाडा मेट्रो स्थानक ते अंबिरॉय स्काय सिटी मॉलदरम्यान पादचारी पूल बांधण्यात आला असून हा मॉल आणि पूल नागरिकांनासाठी खुला झाला. बोरिवलीतील ऑबेरॉय स्काय सिटी मॉल थेट जवळच असलेल्या मेट्रो-७ मार्गिकतील देवीपाडा मेट्रो स्थानकाशी जोडण्यासाठी ऑबेरॉय रिपल्टीने एमएमआरडीएकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार प्रस्तावास मान्यता देऊन ऑबेरॉय स्काम सिटी मॉल- देवीपाडा मेट्रो स्थानक दरम्यान पादचारी पूल बांधण्यात आला आहे. एमएमआरडीए एमएमआरमध्ये ३३७ किमी विणत आहे. मुंबईत अंदाजे लांबीचे मेट्रोचे जाळे सध्या ३३७ किमीपैकी ५९ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्या १ (घाटकोपर आहेत. यात मेट्रो अंधेरी वर्सोवा), मेट्रो-२ अ (दहिसर अंधेरी प.), मेट्रो-३ (आरे (दहिसर बीकेसी), मेट्रो-७गुंदवली) या मार्गिकांचा बात समावेश आहे. येत्या एक-दोन वर्षात आणखी काही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होणार आहेत.


मेट्रो सेवा ही वाहतुकीचा कार्यक्षम पर्याय ठरवा यासाठी एमएमआरडीएकडून मेट्रो प्रकल्पातील विविध सुविधांना बळकटी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून नुकत्याच झालेल्या दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉनिक फोरम २०२५ मध्ये एमएमआरडीए आणि क्रॉसरेलमध्ये एक सांमजस्य करार झाला. या करारानुसार युकेमधील क्रॉसरेल इंटरनॅशनल एमएमआरमधील मेट्रो प्रकल्पांमधील विविध सेवांसाठी आवश्यक ती मदत करणार आहे. विविध सेवांना बळकटी देण्याच्यादृष्टीने क्रॉसरेल एमएमआरडीएला सहकार्य करणार आहे. मेट्रो प्रकल्पातील कार्यप्रणाली, देखभाल, सुरक्षा, डिजिटल परिवर्तन या सेवा आणखी मजबूत करून मेट्रो वाहतूक कार्यक्षम करण्यासाठी आता क्रॉसरेलची मदत होणार आहे.

Comments
Add Comment

BMC : गुडन्यूज मुंबईकरांनो! मुंबई मनपाची ‘म्हाडा स्टाईल’ योजना, ४२६ घरं कमी दरात मिळवण्याची सुवर्णसंधी!

मुंबई : मुंबईतील नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) आता

सायबर हल्ल्याच्या भीतीने मुंबई महापालिका अलर्ट मोडवर, विभागांना केल्या अशा सूचना

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचे कामकाज संगणक प्रणालीद्वारेच केले जात असल्याने या अद्ययावत तंत्रज्ञान आणि

इमारतीवरून वीट कोसळून तरुणीचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : जोगेश्वरी पूर्वेत मजासवाडी परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास कामासाठी जात असलेल्या २२ वर्षीय

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत उबाठा चुकीचा गैरसमज पसरवतंय - राहुल शेवाळे

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्रीकांत यांच्या खंडपीठाने १२ नोव्हेंबरची तारीख ही निकालासाठी दिलेली

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगवान पोर्शे कार डिव्हायडरला धडकली, ड्रायव्हर गंभीर जखमी

मुंबई: मुंबईत बुधवारी रात्रीच्या सुमारास कारचा गंभीर अपघात घडला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगाने जाणारी

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,