Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीEmran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीचा 'आवारापन-२' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Emran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीचा ‘आवारापन-२’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इमरान हाश्मी नेहमीच चर्चेत असतो. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून इमरानने बॉलिवूडमध्ये त्याचं बस्तान बसवलं.अलिकडेच इमरान हाश्मी टायगर-३ चित्रपटामुळे चर्चेत आला होता. आज २४ मार्चला अभिनेत्याचा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून इमराने आवारापन चित्रपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा केली आहे.

इमरान हाश्मीच्या १८ वर्ष जुन्या चित्रपटाचा लवकरच सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो चित्रपट म्हणजे आवारापन आहे. नुकतीच इमरान हाश्मीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे. “बस मुझे कुछ दिन और जिंदा रख…, ‘आवारापन-२’ लवकरच तुमच्या भेटीला येत आहे. “अशा आशयाची पोस्ट अभिनेत्याने शेअर केली आहे. ३ एप्रिल २०२६ हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे.

घरामध्ये या ३ गोष्टी ठेवणे मानले जाते शुभ, चौपट होईल प्रगती

‘आवारापन’ हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. परंतु बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. मोहित सूरी दिग्दर्शित या सिनेमात साउथ अभिनेत्री श्रिया सरण इमरान हाशमीसोबत मुख्य भूमिकेत होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -