Accident News : काश्मीरमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील ३ पर्यटकांसह चौघांचा मृत्यू

  192

श्रीनगर : मध्य काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील कंगन येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या छावणीजवळ रविवारी (दि.२३) बस आणि कारची टक्कर होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात महाराष्ट्रातील ३ पर्यटकांसह एका स्थानिक चालकाचा मृत्यू झाला आहे. तर २१ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील २ पर्यटकांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती देताना कंगनचे ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ. अर्शिद बाबा यांनी सांगितले की, 'ही एक दुर्दैवी घटना आहे.



केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या छावणीजवळ कार आणि प्रवासी बसमध्ये ही टक्कर झाली. यात महाराष्ट्रातील ३ जणांसह ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २१ जण जखमी झाले आहेत. या सर्वांवर उपचार सुरु आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.' मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातातील मृतांनी ओळख पटली असून यात लेशिया आशिष परी, निक्की आशिष परी, हेतल आशिष परी या महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. तसेच ड्रायव्हर फहीम अहमद बदयारी जो सोईतांग श्रीनगरचा रहिवासी आहे, याचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. जखमींपैकी २ जणांना हाडांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तर ८ जणांना एसकेआयएमएसमध्ये पाठवण्यात आले आहे. ५-६ जण सध्या निरीक्षणाखाली आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र २ जणांची प्रकृती गंभीर आहे.


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी आणि बचाव पथकानी बचाव कार्य केलं. या घटनेबाबत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दुःख व्यक्त करत एका निवेदनात म्हटले आहे की, कंगनजवळील महामार्गावर झालेल्या रस्ते अपघातामुळे खूप दुःख झाले आहे, यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहे. शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या मनापासून संवेदना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो. सध्या अधिकारी मदतकार्यात व्यस्त आहेत.

Comments
Add Comment

विक्रमादित्य वैदिक घड्याळाचे उज्जैनमध्ये अनावरण

उज्जैन : बहुचर्चित विक्रमादित्य वैदिक घड्याळ आणि मोबाइल ॲपचे अनावरण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव

भारतासोबत सेमीकंडक्टरचे भविष्य घडवण्यास जग तयार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : जगाची शक्ती सेमीकंडक्टर चिप्समध्ये एकवटली;पूर्वी तेलाच्या विहिरीद्वारे भविष्य ठरायचे, एक दिवस जग

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध